Mumbai Indians all matches full list, IPL 2025 Schedule: भारतातील सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक आज बीसीसीआयने जाहीर केले. यंदाचा स्पर्धेचा १८वा हंगाम असणार आहे. या हंगामाची सुरुवात २२ मार्चपासून होईल तर अंतिम सामना २५ मे रोजी खेळवला जाईल. स्पर्धेचा पहिला सामना, बाद फेरीतील क्वालिफायर-२ सामना आणि अंतिम सामना गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्सचे होम ग्राऊंड असलेल्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवण्यात येईल. स्पर्धेची सुरुवात २२ मार्चला कोलकाता विरूद्ध बेंगळुरू (KKR vs RCB) या सामन्याने होईल. तर स्पर्धेतील सर्वात यशस्वी दोन संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आपल्या स्पर्धेची सुरुवात २३ मार्चला एकमेकांविरूद्धच्या लढतीने करतील. त्या निमित्ताने जाणून घेऊया, मुंबई इंडियन्सच्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांच्या तारखा.
मुंबई इंडियन्सचे यंदाच्या हंगामातील सर्व सामने-
- २३ मार्च - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
- २९ मार्च - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स
- ३१ मार्च - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
- ४ एप्रिल - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
- ७ एप्रिल - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
- १३ एप्रिल - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- १७ एप्रिल - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
- २० एप्रिल - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
- २३ एप्रिल - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
- २७ एप्रिल - दुपारी ३.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
- १ मे - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
- ६ मे - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स
- ११ मे - दुपारी ३.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स
- १५ मे - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
मुंबई संघाचे वानखेडे स्टेडियमवरील सामने
- ३१ मार्च २०२५ - सोमवार - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - मुंबई
- ७ एप्रिल २०२५ - सोमवार - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - मुंबई
- १७ एप्रिल २०२५ - गुरुवार - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - मुंबई
- २० एप्रिल २०२५ - रविवार - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स - मुंबई
- २७ एप्रिल २०२५ - रविवार - दुपारी ३.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - मुंबई
- ०६ मे २०२५ - मंगळवार - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स - मुंबई
- १५ मे - गुरुवार - संध्याकाळी ७.३० - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - मुंबई