IPL 2025 Schedule Announced : इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामाची सुरुवात २२ मार्च रोजी ईडन गार्डन्स येथे गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यातील सामन्याने होणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल २०२४ च्या विजेत्या केकेआरचे होम ग्राउंड असलेल्या ईडन गार्डन्समधून हंगामाला सुरुवात होईल आणि तेथेच २५ मे रोजी हंगामातील अंतिम सामना म्हणजेच ग्रँड फिनाले होणार आहे. IPL मधील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले मुंबई इंडियन्स (Mumbai Indian) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात साखळी फेरीतील दोन सामने MI vs CSK २३ मार्च आणि २० एप्रिल या तारखांना होणार आहेत. पाहा संपूर्ण वेळापत्रक-
---
बाद फेरीतील २३ मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर २ चे आयोजन देखील कोलकातामध्येच केलेले आहे. त्याशिवाय, बाद फेरीतील इतर दोन प्ले-ऑफ सामने, २० मे रोजी क्वालिफायर १ आणि २१ मे रोजी एलिमिनेटर, हे सामने २०२४ चे उपविजेते सनरायझर्स हैदराबादच्या होम ग्राउंडमध्ये म्हणजे हैदराबादमध्ये होतील. या हंगामात एकूण ७४ सामने ६५ दिवसांत खेळले जातील. १२ डबल-हेडर असतील आणि सामने १३ शहरांमध्ये खेळले जातील - १० यजमान शहरे तसेच गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि धर्मशाळा येथे खेळले जातील.