Sachin Tendulkar React On Vaibhav Suryavanshi : जयपूरच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल सामना हा ऐतिहासिक ठरला. कारण वैभव सूर्यंवशी नावाच्या १४ वर्षांच्या पोरानं शतकी खेळीसह मैदानं गाजवलं. टी-२० क्रिकेटमधील सर्वात कमी वयात अर्धशतकवीर होऊन समाधान न मानतो त्याने शतकवीर होण्याचा पराक्रम करून दाखवला. आंतरराष्ट्रीय मैदानात धाक असलेल्या गोलंदाजांसमोर त्याने ज्या तोऱ्यात बॅटिंग केली ते बघून हा एक चमत्कार आहे, असंही वाटू शकतं. सोशल मीडियावर सध्या एकच नाव गाजतंय ते म्हणजे वैभव सूर्यंवशी. या पोराच्या शतकाच कौतुक करण्यासाठी क्रिकेटचा देवही मागे राहिलेला नाही. शतकाचा बादशहा सचिन तेंडुलकर याने १४ वर्षाच्या पोराचं शतकी खेळीच कौतुक करताना त्याच्या खेळीमागंच लॉजिकही सांगितलंय.
वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक शतकी खेळीवर काय म्हणाला सचिन तेंडुलकर?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं एक्स अकाउंटवरून वैभव सूर्यंवशीच्या वादळी खेळीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सचिनने युवा क्रिकेटरच्या खेळीच थोडक्यात पण एकदम परफेक्ट विश्लेषणही केलं आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, वैभवचा निडर दृष्टिकोन, बॅट स्विंगची गती, चेंडूचा टप्पा कुठं पडणार हे ओळखण्याच कसब आणि चेंडू मारताना त्याने लावलेली ताकद हाच त्याच्या सुंदर खेळीचा मंत्र होता, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरनं युवा शतकवीरावराचं कौतुक केलं आहे.
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
युसूफ पठाण याने अनुभवला दुग्धशर्करा योग
जयपूरच्या मैदानात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकी खेळी करणारा भारतीय ठरला. ३५ चेंडूत शतक झळकावत त्याने युसूफ पठाणचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला. त्या युसूफ पठाण यानेही वैभव सूर्यंवशी याचे अभिनंदन केले आहे. आपला विक्रम मोडल्याचा आनंद आहे, असे म्हणत युसूफ पठाण याने वैभवला शुभेच्छा दिल्या आहेत. माझा विक्रम राजस्थानच्या ताफ्यातून खेळणाऱ्या खेळाडूने मोडला त्यामुळे हा विक्रम आणखी खास ठरतो, असे त्याने म्हटले आहे. युसूफ पठाण याने राजस्थानकडून खेळताना २०१० मध्ये ३७ चेंडूत शतक झळकावले होते.
युवीनंही हटके अंदाजात शुभेच्छा देत केलं कौतुक
१४ वर्षांचे असताना तुम्ही काय करत होता? असा प्रश्न विचारत युवराज सिंगनं वैभव सूर्यंवशीच्या शतकी खेळीला दाद दिलीये. हा लहान मुलगा डोळ्याची पापणीही न लवता जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करताना पाहायला मिळाले. वैभव सूर्यंवशी हे नाव लक्षात ठेवा. तो अगदी बिनधास्त खेळताना दिसतोय. नव्या पिढीतील प्रतिभा अभिमानास्प वाटते, अशा शब्दांत युवीनं १४ वर्षांच्या पोराला शुभेच्छा दिल्या आहेत.