IPL 2025 RR vs RCB 28th Match : किंग कोहलीचं विक्रमी आणि नाबाद अर्धशतक आणि फिल सॉल्टच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं जयपूरचं मैदान मारलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाने घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालच्या ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ४ बाद १७३ धावा करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर १७४ धावांचे टार्गेट सेट केले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सॉल्टसह विराटची फिफ्टी
राजस्थानच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्टनं ३३ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने १९६.९७ च्या स्ट्राइक रेटसह ६५ धावा कुटल्या. तो आपलं काम करुन गेल्यावर विराट कोहलीनं ४५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ६२ धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला देवदत्त पडिक्कल याने २८ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४० धावा केल्या. कोहलीनं या सामन्यात टी-२० कारकिर्दीतील १०० वे अर्धशतक झळकावत खास विक्रमही रचला.
RR vs RCB : विराटकडून ही अपेक्षा नव्हती! पण त्याला कोण काय बोलणार? बॉलरची रिअॅक्शन बघाच (VIDEO)
घरच्या मैदानात डाळ शिजली नाही, पण ...
आरसीबीच्या संघाचा यंदाच्या हंगामातील ६ सामन्यातील हा चौथा विजय ठरला. खास गोष्ट ही की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने जे दोन सामने गमावले आहेत ते घरच्या मैदानात गमावले आहेत. दिल्ली आणि गुजरात टायटन्स संघाने त्यांना घरात येऊन पराभूत केले. दुसरीकडे जे चार सामने संघाने जिंकले ते IPL ट्रॉफी विजेत्या संघाच्या घरात जाऊन जिंकले आहेत. घरच्या मैदानात अजून डाळ शिजली नसली तरी त्यांचा हा रुबाब एकदम खासच आहे.
RCB च्या संघाने मिळवलेल्या ४ विजयातील खास गोष्ट
यंदाच्या हंगामातील सलामीच्या लढतीत कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला पराभूत करत यंदाच्या मोहिमेची दिमाखात सुरुवात केली. त्यानंतर RCB नं चेन्नई सुपर किंग्जच्या बालेकिल्ल्यात जाऊन १७ वर्षांनी विजय नोंदवला. वानेखेडेच्या मैदानातील दशकभरापासून चालत आलेली पराभवाची मालिका खंडीत करताना त्यांनी मुंबई इंडियन्सला शह दिला. आता राजस्थान रॉयल्स संघाला त्यांनी पराभूत करून दाखवले आहे.
Web Title: IPL 2025 RR vs RCB Virat Kohli Philip Salt Fifty Royal Challengers Bengaluru Innings 9 Wicket Win Against Rajasthan Royals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.