Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम

किंग कोहलीचा मोठा पराक्रम, १०० अर्धशतकासह नावे केला खास विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 19:08 IST2025-04-13T19:06:01+5:302025-04-13T19:08:22+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 RR vs RCB Virat Kohli Becomes 1st Indian Batter To Complete 100 Fifties In T20 Cricket Only David Warner Ahead Of Him See Record | Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम

Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Becomes 1st Indian Batter To Complete 100 Fifties In T20 Cricket  :क्रिकेट जगतातील किंग विराट कोहलीनं टी-२० क्रिकेटच्या छोट्या प्रारुपात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. आयपीएल स्पर्धेत रविवारी जयपूरच्या मैदानात रंगलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी साकारली. या अर्धशतकासह टी-२० क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 डेविड वॉर्नर पहिला; त्याच्यानंतर लागतो किंग कोहलीचा नंबर
 
क्रिकेट जगतात डेविड वॉर्नरनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर याने सर्वात आधी टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतकांची शंभरी साजरी केली होती. त्याच्या  खात्यात टी-२० क्रिकेटमध्ये १०९ शतकांची नोंद आहे.  राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेल्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने ३९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने अर्धशतक साजरे केले. या सामन्यात त्याने ४५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ६२ धावांची खेळी करत संघाच्या विजयातही मोलाचा वाटा उचलला.

RR vs RCB : विराटकडून ही अपेक्षा नव्हती! पण त्याला कोण काय बोलणार? बॉलरची रिअ‍ॅक्शन बघाच (VIDEO)

Web Title: IPL 2025 RR vs RCB Virat Kohli Becomes 1st Indian Batter To Complete 100 Fifties In T20 Cricket Only David Warner Ahead Of Him See Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.