IPL 2025 RR vs RCB Suyash Sharma Disappointed With Virat Kohli : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात विराट कोहलीनं क्षेत्ररक्षणा वेळी मोठी चूक केली. एक साधा सोपा कॅच त्याने सोडला. किंग कोहलीनं झेल सोडल्यावर फिरकीपटू सुयश शर्माची रिअॅक्शन बघण्याजोगी होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'विराट' चूक; अशी होती सुयश शर्माची रिअॅक्शन
राजस्थान रॉयल्सच्या डावातील १७ व्या षटकातील अखेरच्या षटकात सुयश शर्मा गोलंदाजी करत होता. या षटकातील अखेरच्या चेंडूवर ध्रुव जुरेल याने लाँग-ऑफच्या दिशेने चेंडू मारला. विराट कोहली कॅचवर आला. पण साधा एक झेल त्याला पकडता आला नाही. विराट कोहली हा फिट अन् हिट खेळाडू म्हणून ओळखला जातो. फिल्डवर त्याच्याकडून अशा कामगिरीची अपेक्षा नसते. संघातील अन्य खेळाडूकडून कॅच ड्रॉप होतो त्यावेळी कोहली त्याच्यावर चिडल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आता त्याला कोण बोलणार? असाच प्रश्न बॉलरच्या मनात निर्माण झाल्याचे दिसून आले. सुयश शर्मानं चेंडूवर नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
IPL 2025 RR vs RCB : अपयशानंतर पुन्हा 'यशस्वी' डाव! पण मोठी संधी हुकली
याआधी सुयशच्या चेंडूवरच सुटला होता एक झेल, त्यावेळी विराटनं काढला होता फिल्डरवर राग
राजस्थान रॉयल्सच्या डावातील १० व्या षटकातील पाचव्या चेंडुवरही एक झेल सुटला होता. त्यावेळीही गोलंदाजीला सुयश शर्माच होता. गोलंदाजीवरच यश दयाल याने रियान परागच्या विकेटची संधी गमावली होती. यश दयालकडून झेल सुटल्यावर विराट कोहलीनं त्याच्यावर रागही काढला. पण ज्यावेळी आपल्याकडे कॅच आला त्यावेळी त्या संधीच विकेटमध्ये रुंपातर करायला तो चुकला.