आयपीएल स्पर्धेतील ५९ व्या लढतीत आघाडी कोलमडल्यावरही पंजाब किंग्जच्या संघाने राजस्थान विरुद्धची लढाई २०० पारची केली. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडिमवर रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरनं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय तुषार देशपांडेच्या भेदक माऱ्यामुळे कुठंतरी चुकीचा ठरतोय असे वाटले. अवघ्या ३४ धावांवर ३ विकेट्स गमावलेल्या पंजाब किंग्जच्या संघाने नेहल वढेरा ७० (३७) आणि शशांक सिंह ५९ (३०) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्जच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २१९ धावा केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंजाबच्या नावे झाला खास विक्रम
पंजाब किंग्जच्या संघाने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात २१९ धावांसह खास विक्रम आपल्या नावे केला. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावंसख्या आहे. याचा अर्थ राजस्थान रॉयल्सच्या संघाला सामना जिंकण्यासाठी विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करावा लागेल.
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
नेहल वढेराची सर्वोच्च धावसंख्या, शशांकचा परफेक्ट फिनिशिंग टच
पंजाब किंग्ज कडून नेहल वढेरानं ३७ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ७० धावांची सर्वोच्च खेळी केली. त्यानंतर शशांक सिंह याने ३० चेंडूत नाबाद ५९ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्याशिवाय अखेरच्या षटकात ओमरझाईनं ९ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ धावांची नाबाद खेळी केल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय श्रेयस अय्यरनं २५ चेंडूत ३० धावा आणि प्रभसिमरन सिंग याने १० चेंडूत २१ धावांची खेळी केली.
Web Title: IPL 2025 RR vs PBKS Punjab Kings Multiple Records vs Rajasthan Royals Nehal Wadhera And Shashank Singh Shine
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.