IPL 2025 RR vs PBKS 59th Match Lokmat Player to Watch Prabhsimran Singh And Priyansh Arya : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ५९ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात रंगणार आहे. जयपूरच्या मैदानात रंगलेला सामना घरच्या मैदानात खेळणाऱ्या राजस्थानच्या तुलनेत पंजाब किंग्जसाठी महत्त्वाचा असेल. राजस्थानचा संघ आधीच स्पर्धेतून आउट झाला आहे. दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ उर्वरित सर्व सामने जिंकून प्लेऑफ्सच्या शर्यतीत आघाडीच्या २ मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्नशील असेल. कर्णधार श्रेयस अय्यरशिवाय या संघाकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या अनकॅप्ड जोडीनं धमाका केलाय. उर्वरित सामन्यात ते आपला तोरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतील. इथं एक नजर टाकुयात यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम अनकॅप्ड जोडीच्या खास कामगिरीवर
जोडीला तोड नाही
पंजाब किंग्जच्या संघाने डावाला सुरुवात करण्यासाठी प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या जोडीवर भरवसा दाखवला. दोघांनी या संधीच सोनं करून दाखवलं. यंदाच्या हंगामात पंजाबचा संघ हा एकमेव असा संघ आहे ज्यांनी ओपनिंगची जबाबदारी अनकॅप्ड प्लेयर्सवर दिलीये. ही जोडी ४०० पेक्षा अधिक धावांसह आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी सलामी जोडी आहे.
दोन शतकी वेळा शतकी भागीदारी, पण रेकॉर्डवर राहणार एकच
भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे धर्मशालाच्या मैदानात रंगलेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना स्थगित करण्यात आला होता. या सामन्यात प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन या जोडीनं १२२ धावांची सलामी दिली होती. यात प्रभसिमरन सिंगनं २८ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या होत्या. दुसरीकडे प्रियांश आर्य याने ३४ चेंडूत ७० धावांची धमाकेदार इनिंग खेळली होती. याशिवाय कोलकाता विरुद्ध या जोडीनं पहिल्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी रचली होती. भारत-पाक तणावामुळे दिल्लीविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे हा सामना पुन्हा खेळवण्यात येणार असल्यामुळे १२२ धावांची शतकी भागीदारी रेकॉर्डमध्ये दिसणार नाही.
यंदाच्या हंगामातील जोडीची कामगिरी, एक लवकर परतल्यावर दुसऱ्यानं सावरलाय डाव
- प्रियांश आर्य ४७ धावा आणि प्रभसिमरन सिंग ५ धावा, भागीदारी २८ धावा विरुद्ध गुजरात
- प्रियांश आर्य ८ धावा आणि प्रभसिरमन सिंग ६९ धावा, २६ धावा विरुद्ध लखनौ
- प्रियांश आर्य ० धावा आणि प्रभसिरमन सिंग १७ धावा, भागीदारी ० धावा विरुद्ध राजस्थान
- प्रियांश आर्य १०३ धावा आणि प्रभसिमरन सिंग ० धावा, भागीदारी १७ धावा विरुद्ध चेन्नई
- प्रियांश आर्य ३६ धावा आणि प्रभसिमरन सिंग ४२ धावा, भागीदारी ६६ धावा विरुद्ध हैदराबाद
- प्रियांश आर्य २२ धावा आणि प्रभसिमरन सिंग ३० धावा, भागीदारी ३९ धावा विरुद्ध कोलकाता
- प्रियांश आर्य १६ धावा आणि प्रभसिमरन सिंग १३ धावा, भागीदारी २२ धावा विरुद्ध बंगळुरु
- प्रियांश आर्य ६९ धावा आणि प्रभसिमरन ८३ धावा, भागीदारी १२० विरुद्ध कोलकाता
- प्रियांश आर्य २३ धावा आणि प्रभसिमरन सिंग ५४ धावा, भागीदारी ४४ धावा विरुद्ध चेन्नई
- प्रियांश आर्य १ धाव आणि प्रभसिमरन ९१ धावा, भागीदारी २ धावा विरुद्ध लखनौ
- प्रियांश आर्य ७९ धावा आणि प्रभसिमरन ५० धावा भागीदारी १२२ विरुद्ध दिल्ली (सामना रद्द झाल्यामुळे हा सामना पुन्हा खेळवण्यात येणार आहे.)