राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या जयपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात रोहित शर्मानं आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील तिसऱ्या अर्धशतकाला गवसणी घातली. ३१ चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या रोहित शर्मानं या सामन्यात ५३ धावांची खेळी केली. या दमदार खेळीसह रोहित शर्मानं खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्मानं अर्धशतकासह साधला मोठा डाव
रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ६००० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये एका फ्रँचायझीकडून हा पल्ला गाठणारा रोहित शर्मा हा दुसरा खेळाडू आहे. या यादीत विराट कोहली आघाडीवर आहे. त्याने RCB कडून ८८७१ धावा केल्या आहेत. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहित दुसऱ्याच षटकात फसला होता. फझलहक फारूखी (Fazalhaq Farooqi) च्या षटकात पंचांनी त्याला पायचित आउटही दिले होते. रिव्ह्यू घेऊ का नको.. या संभ्रमात एक सेकंद उरला असताना रोहितनं रिव्ह्यू घेतला अन् तो नाबाद ठरला.
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
रोहित शर्मानं अडखळत केली होती हंगामाची सुरुवात, पण...
रोहित शर्मानं यंदाच्या हंगामातील पहिल्या पाच सामन्यात एकही अर्धशतक झळकावले नव्हते. पण मागील पाच सामन्यात त्याच्या भात्यातून आता तिसरे अर्धशतक पाहायला मिळाले आहे. मागील चार सामन्यात त्याने ७६*, ७०, १२, ५३ अशा धावा केल्याचे पाहायला मिळाले आहे. रोहित शर्मानं राजस्थान विरुद्ध सावध सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या भात्यातून काही सुंदर फटके पाहायला मिळाले. ९ चौकाराच्या मदतीने त्याने १४७ च्या स्ट्राइ रेटनं ५३ धावा केल्या. सलामीवीर रायन रिकल्टन याच्यासोबत त्याने ११६ धावांची भागीदारी रचली.