जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या २०० पारच्या लढाईत मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सला १०० धावांनी मात दिली. २००८ आणि २०१७ च्या हंगामानंतर तिसऱ्यांदा मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलच्या एका हंगामात सलग सहा विजय मिळवण्याचा खास पराक्रम करून दाखवला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीवर सर्वांच्या नजरा होत्या. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात २०० धावांचे टार्गेट पार करताना शतकी खेळीसह निम्म्या धावा करणारा वैभव मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरला. दोन चेंडूचा सामना केल्यावर खातेही न उघडता त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. दीपक चाहरच्या पहिल्याच षटकात त्याने विकेट फेकली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सामन्यानंतर रोहित युवा बॅटरला भेटला, अन्...
कोणत्याही खेळाडूसाठी प्रत्येक दिवस सारखा नसतो. वैभव सूर्यंवशीच्या बाबतीत तेच घडलं. विक्रमी शतकवीर MI विरुद्ध सपशेल अपयशी ठरला. १४ वर्षांच्या पोरावर ऐतिहासिक शतक झळकवल्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आता पदरी भोपळा पडल्यावर काही तिखट प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटत आहेत. पण त्या सर्वात लक्षवेधी ठरतीये ती रोहित शर्मा अन् युवा वैभव सूर्यंवशी याची खास भेट. ज्यात हिटमॅन रोहित शर्मा MI विरुद्धच्या सामन्यात फ्लॉप ठरलेल्या युवा बॅटरला काहीतरी कानमंत्र देताना दिसून येते. दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
आधी खेळीला दाद दिली, आता पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
वैभव सूर्यवंशी याच्या वादळी शतकी खेळीनंतर त्याच्यावर कौतुक करण्यात रोहितही मागे नव्हता. इन्स्टाग्रामवरून 'क्लास' या एका शब्दात भारतीय संघाच्या कर्णधाराने युवा बॅटरला दाद दिल्याचे पाहायला मिळाले होते. आता अपयशी ठरल्यावर रोहितनं त्याला धीर दिल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाच्या कर्णधारा रोहितनं साधलेला संवाद हा युवा बॅटरसाठी एक बूस्टच आहे. रोहितनं त्याला पुन्हा हिमतीनं खेळण्याचं बळ दिलंय असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.