IPL 2025 : "फ्लावर नहीं फायर हूँ..." तोऱ्यात मिरवणारा RR च्या ताफ्यातील 'पुष्पा'

इथं जाणून घेऊयात सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूची यंदाच्या हंगामातील कामगिरी अन् IPL मधील आतापर्यंतचा रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:09 IST2025-04-19T17:08:35+5:302025-04-19T17:09:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 RR vs LSG 36th Match Lokmat Player to Watch Wanindu Hasaranga Rajasthan Royals | IPL 2025 : "फ्लावर नहीं फायर हूँ..." तोऱ्यात मिरवणारा RR च्या ताफ्यातील 'पुष्पा'

IPL 2025 : "फ्लावर नहीं फायर हूँ..." तोऱ्यात मिरवणारा RR च्या ताफ्यातील 'पुष्पा'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 RR vs LSG 36th Match Player to Watch Wanindu Hasaranga Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ३६ वा सामना जयपूरच्या मैदानात रंगणार आहे. यंदाच्या हंगामात राजस्थानच्या ताफ्यातून संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल या प्रमुख खेळाडूंशिवाय श्रीलंकन ऑलराउंडर वानिंदु हसरंगाही लक्षवेधी ठरताना दिसत आहे. विकेट घेतल्यावर  "फ्लावर नहीं फायर हूँ..." तोऱ्यात तो  पुष्पा स्टाइल सेलिब्रेशनसहही तो मैफिल लुटताना दिसते.  इथं जाणून घेऊयात सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूची यंदाच्या हंगामातील कामगिरी अन् IPL मधील आतापर्यंतचा रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

RCB संघाकडून पदार्पण, २०२२ च्या हंगामात नोंदवली होती सर्वोच्च कामगिरी

उजव्या हाताने बॉलिंग बॅटिंग करणारा वानिंदु हसरंगा फिरकीनं प्रतिस्पर्धी फलदांजाची गिरकी घेण्यासोबत आपल्या भात्यातील फटकेबाजीच्या जोरावर मॅच फिरवण्याची क्षमता बाळगतो. २०२१ च्या हंगामात हसरंगाने RCB च्या संघाकडून पदार्पण केले होते. २०२३ पर्यंत विराटच्या संघाकडून खेळल्यावर तो गत हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळताना दिसले होते. २०२२ च्या हंगामात आरसीबीकडून त्याने १८ धावा खर्च करत ५ विकेट्सही घेतल्या होत्या. ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. IPL मध्ये आतापर्यंत त्याने ३१ सामन्यात ४२ विकेट्स घेतल्या आहेत. 

IPL 2025 : साडेसात कोटींच्या गड्याची 'साडेसाती' कधी संपणार?

 हसरंगा यंदाच्या हंगामातील कामगिरी

यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करताना त्याने ३ षटकात ३४ धावा खर्च करत एक विकेट घेतली होती. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याने आपल्या फिरकीची जादू दाखवून देताना ४ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. ४ षटकात ३४ धावा खर्च करत केलेली ही कामगिरी आयपीएल कारकिर्दीतील त्याची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. याशिवाय पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने प्रत्येकी १-१ विकेट घेत त्याने ५ सामन्यात ७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. उर्वरित सामन्यात तो कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल. 

Web Title: IPL 2025 RR vs LSG 36th Match Lokmat Player to Watch Wanindu Hasaranga Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.