Join us

IPL 2025 : साडे सात कोटींच्या गड्याची 'साडेसाती' कधी संपणार?

दुप्पट पगार वाढ झालेल्या या खेळाडूकडून LSG संघाला मोठी अपेक्षा आहे, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:17 IST

Open in App

IPL 2025 RR vs LSG 36th Match Player to Watch David Miller : आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी लखनौ सुपर जाएंट्सच्या संघानं तगड्या फलंदाजांसह तगडी संघ बांधणी केलीये. कॅरेबियन टी-२० किंग निकोलस पूरन हा प्रत्येक सामन्यात मैफिल लुटताना दिसतोय. फक्त बॅटिंगच्या जोरावर ऑस्ट्रेलियन मिचेल मार्शनही छाप सोडलीये. पण या ताफ्यातील साडेसात कोटींच्या गड्याला अजून आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजारा दाखवता आलेला नाही. निकोलस पूरन आणि मार्श ही कमी पडतील तेव्हा हा गडी संघाचा आधार आहे. पण त्याची बॅट अजून शांतच आहे. साडेसात कोटीच्या गड्याची ही साडेसाती उर्वरित सात सामन्यात तरी संपणार का? हा मोठा प्रश्नच आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पदार्पणात ट्रॉफी जिंकणाऱ्या GT च्या विजयात उचलला होता मोलाचा वाटा

दक्षिण आफ्रिकेच्या संघातील डेविड मिलर हा तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्याला किलर मिलर म्हणूनही ओळखले जाते. २०२२ च्या हंगामात गुजरात टायटन्सच्या संघाला चॅम्पियन करण्यात या गड्यानं मोलाचा वाटा उचलला होता. या हंगामात त्याने १६ सामन्यात ४८१ धावा कुटल्या होत्या. याच हंगामात त्याच्या भात्यातून नाबाद ९४ धावांची खेळी आली होती. आयपीएल कारकिर्दीतील ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. 

हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय

दुप्पट पगार मिळाला, पण...

पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स या फ्रँचायझी संघानंतर डेविड मिलर मागील ३ हंगामात गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून खेळताना पाहायला मिळाले. ३ कोटीसह गुजरातकडून खेळणाऱ्या या गड्याला लखनौच्या संघाने ७.५० कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतले आहे.  पगाल दुप्पट वाढला, पण त्याप्रमाणे त्याच्या कामगिरीत काही धमक दिसलेली नाही. आयपीएल स्पर्धेआधी डेविड मिलरनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दमदार शतकी खेळी केली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायल लढतीत त्याने दमदार खेळी केली होती. पण ही स्पर्धा संपली अन् त्याचा फॉर्मही या शतकासोबतच गायब झाल्याचे दिसते.

डेविड मिलरची यंदाच्या हंगामातील कामगिरी

यंदाच्या हंगामात डेविड मिलरनं ७ सामन्यात २७ धावा केल्या आहेत. नाबाद २७ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी राहिलीये. मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने १४ चेंडूत २७ धावा केल्या होत्या. पाचव्या सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या या गड्याकडून संघाला मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा आहे. तो उर्वरित सामन्यात आपल्या बॅटिंगमधील तोरा दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५लखनौ सुपर जायंट्सराजस्थान रॉयल्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट