Join us

IPL 2025 RR vs KKR: संजूचा नो 'इम्पॅक्ट' शो!; आपल्या विकेटसाठी स्वत:च विणलं यॉर्करचं जाळं (VIDEO)

पहिल्या सामन्यात अर्धशतक आल ते वाया गेल.. आता स्थिरावण्याआधी तंबूत जाण्याची आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 20:49 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन 'इम्पॅक्ट' टाकण्यात अपयशी ठरला. अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकू पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर यशस्वी जैस्वालसह संजू सॅमसन याने राजस्थान रॉयल्स संघाच्या डावाची सुरुवात केली. पण संघाच्या धावफलकावर अवघ्या ३३ धावा असताना संजूच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वैभव अरोराच्या गोलंदाजीवर फसला संजू

संजू सॅमसन हा दुखापतीतून सावरून ताफ्यात जॉईन झाल्यापासून 'इम्पॅक्ट प्लेयर'च्या रुपात खेळताना दिसतोय. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केलेल्या संजूकडून या सामन्यातही चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. त्याच्या भात्यातून दोन चौकारही आले. पण १३ धावांवर असताना वैभव अरोरानं त्याचा बोल्ड केले. ११ चेंडूचा सामना करून तो तंबूत परतला. त्यामुळे RR च्या संघानं त्याच्यावर 'इम्पॅक्ट प्लेयर'च्या रुपात जो डाव खेळलाय तो फसवा ठरला.  त्याची विकेट संघाच्या अडचणी वाढवणारी होती.

IPL 2025 : अविश्वसनीय! आयपीएलच्या इतिहासात कुणाला जमलं नाही ते श्रेयस अय्यरनं करून दाखवलं

वैभव अरोरानं  टाकलेला चेंडू मारताना संजूनं स्वत:च आपल्यासाठी यॉर्करचं जाळं विणलं. चेंडूचा टप्पा पडण्याआधी संजू चेंडू मारण्यासाठी  लेग स्टंपच्या बाहेर सरकत पुढे आला अन् तो बोल्ड झाला. त्याची विकेट घेतल्यावर वैभव आरोरानं आक्रमक अंदाजात सेलिब्रेशनही केल्याचे पाहायला मिळाले.  

 

पहिल्या सामन्यात फिफ्टी आली, पण...

राजस्थान रॉयल्सच्या संघानं सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यातून आपल्या यंदाच्या मोहिमेला सुरुवात केली. या सामन्यापासूनच नियममित कर्णधार संजू सॅमसन इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरतोय. परिणामी रियान पराग राजस्थान संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनच्या भात्यातून अर्धशतकी खेळी आली, त्याने ३७ चेडूत ६६ धावांची खेळी केली होती. पण सनरायझर्स हैदराबादनं दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्याची ही खेळी फिकीच ठरली. या सामन्यात राजस्थानच्या पदरी पराभव आला होता. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५राजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्ससंजू सॅमसन