IPL 2025 RR vs GT : १४ वर्षाच्या वैभव सूर्यंवशीच्या शतकी खेळीसह यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघाने २०० पारची लढाई अगदी दिमाखात जिंकली. गुजरात टायटन्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना शुबमन गिल आणि जोस बटलरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २०९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यंवशी याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील तिसऱ्या सामन्यात पहिले शतक झळकावत अनेक विक्रमाला गवसणी घातली. तो माघारी फिरल्यावर यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग या जोडीनं १५.५ षटकात २ विकेट्च्या गमावत २१२ धावा करत ८ विकेट्स आणि २५ चेंडू राखून सामना जिंकला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभवची ऐतिहासिक खेळी, यशस्वीचाही तोरा राजस्थानच्या संघाने दिमाखात जिंकला सामना
आयपीएल स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा होता. जर सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार हे पक्के होते. हा दबाव त्यात २०० पेक्षा अधिक धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी बिनधास्त अंदाजात फटकेबाजी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी रचली. वैभव सूर्यंवशी याने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ११ षटकाराच्या मदतीने १०१ धावांची ऐतिहासिक खेळी केली. याशिवाय यशस्वी जैस्वाल याने ४० चेंडूत ९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ७० धावांची खेळी केली. रियान परागने १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ३२ धावांची खेळी केली.
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी