IPL 2025 RR vs GT 47th Match Player to Watch Shubham Dubey Rajasthan Royals : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने इतिहास रचला. वैभव सूर्यंवशीच्या माध्यमातून त्याने १४ वर्षाच्या पोराला पदार्पणाची संधी दिली. याच संघाने प्रविण तांबेच्या रुपात सर्वात वयस्क खेळाडूला पदार्पणाची संधी दिल्याचा रेकॉर्ड आहे. आयपीएलच्या या दोन खास रेकॉर्डशिवाय IPL चा पहिला हंगाम गाजवण्याचा पराक्रमही याच संघाने करून दाखवला होता. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थानच्या संघानेच आयपीएलची पहिली ट्रॉफी जिंकली होती. पण त्यानंतर संघाला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यंदाच्या हंगामात पहिल्या ९ सामन्यात २ विजय आणि ७ पराभवासह फक्त ४ मिळवून राजस्थानचा संघ तळाला आहे. स्पर्धेत टिकणं मुश्किल झाले असताना आता उर्वरित सामन्यात आपल्या ताफ्यातील खास मोहऱ्यांंना बढती देऊन आगामी स्पर्धेत परफेक्ट कॉम्बिनेशनसह मैदानात उतरण्यासाठी काही प्रयोग करण्याची संधी या संघासमोर असेल. हा प्रयोग ते आजमावणार का? त्यात IPL मध्ये मालामाल होऊनही पुरेशी संधी न मिळालेल्या विदर्भाच्या पठ्ठ्याला अधिकाधिक संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल. इथं जाणून घेऊयात राजस्थानकडून खेळणाऱ्या यवतमाळच्या 'बिग हिटर'ची खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
५.८ कोटी प्राइज टॅगसह IPL मध्ये पदार्पण
आर्थिक परिस्थितीत बेताची असलेल्या अनेक क्रिकेटर्स आयपीएलममुळे मालालमा झाल्याचे पाहायाला मिळाले आहे. त्यातीतल एक चेहरा म्हणजे राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळणारा शुभम दुबे. २०२४ च्या आयपीएल हंगामाआधी राजस्थान रॉयल्सच्या संघाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाकडून खेळणाऱ्या या क्रिकेटरला ५.८ कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. २०२३ च्या हंगामातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत ७ सामन्यात २२१ धावा केल्यावर त्याला आयपीएलची मोठी लॉटरी लागली होती. या स्पर्धेत डावखुऱ्या फलंदाजाने २० चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी करत आपल्यातील बिग हिटरची क्षमता दाखवली होती.
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
पदार्पणाच्या हंगामात फक्त ४ सामन्यातच मिळाली संधी
राजस्थान फ्रँचायझी संघ हा भारतीय प्रतिभावंत खेळाडूंना अधिक प्राधान्य देताना दिसते. पण विदर्भाच्या पठ्ठ्याला पदार्पणाच्या हंगामात फक्त ४ सामने मिळाले. त्यातही ३ सामन्यात त्याने बॅटिंग केली. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ६ चेंडूत त्याला फक्त ८ धावा करता आल्या. गत हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं १२ चेंडूत २५ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले. तर सीएसकेविरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर गोल्डन डकची वेळ आली.
यंदाच्या हंगामातील कामगिरी
यंदाच्या हंगामात ८० लाख प्राइज टॅगसह राजस्थानच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात पुन्हा सामील करून घेतले. यंदाच्या स्पर्धात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने ११ चेंडूत ३२४ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले. बंगळुरु विरुद्ध ७ चेंडूत १२ धावांची खेळी वगळता तीन सामन्यात तो एकेरी धावसंख्येवरच माघारी फिरला. आता उर्वरित सामन्यात मिळालेल्या संधीच मोठ्या धावसंख्येत रुपांतर करण्यात तो यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.
आर्थिक परिस्थितीत बेताची असताना क्रिकेटच्या मैदानात उतरला, आता...
शुभम दुबे हा मूळचा यवतमाळचा. त्याचे संपूर्ण शिक्षण हे नागपुरात झाले. सुरुवातीच्या काळात क्रिकेट खेळायची इच्छा होती, पण आर्थिक परिस्थितीमुळे क्रिकेट किट खरेदी करणंही शक्य नव्हते. क्रिकेटरनं एका मुलाखतीमध्ये आपल्या प्रवासात वडिलांनी घेतलेल्या मेहनतीची गोष्टही शेअर केली होती. त्याच्या वडिलांनी हॉटेल मॅनेजरपासून ते अगदी पान टपरी चालवण्यापर्यंत वेगवेगळी कामे करत पोराला क्रिकेटर करण्याचं स्वप्न साकार केले आहे.