IPL 2025 RR vs GT 47th Match Lokmat Player to Watch Ishant Sharma Gujarat Titans : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. बॅटिंगमध्ये शुबमन गिल आणि साई सुदर्शन टॉप क्लास कामगिरी करत आहेत. दुसरीकडे गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णासह अन्य गोलंदाजही संघासाठी बहुमूल्य योगदान देताना दिसते. अनुभवी जलदगती गोलंदाज इशांत शर्माही त्यापैकी एक. त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीनं सर्वांना सरप्राइज केल्याचे पाहायला मिळाले. इथं जाणून घेऊयात आयपीएलमधील त्याची कामगिरी अन् यंदाच्या हंगामातील त्याच्या गोलंदाजीत पाहायला मिळालेली खास गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
.. अन् पुन्हा पकडला वेग
इशांत शर्मा हा भारतीय संघातील जलदगती गोलंदाज आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी तो सातत्याने १४० kph वेगाने चेंडू टाकताना पाहायला मिळाले. गोलंदाजीतील वेग १२४ kph पर्यंत घसरल्यावर त्याने आपल्या गोलंदाजीत नव्याने धार आणली आहे. गुडगाव येथील स्पेस लॅबमध्ये कसून सराव करत जोन्स आणि मेंहदीरत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने गोलंदाजीत कमालीची सुधारणा केल्याचे दिसते. त्याच्या गोलंदाजीत पुन्हा एकदा जुने तेवर पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामात त्याने ५ सामन्यात फक्त ३ विकेट्स घेतल्या असल्या तरी तो ज्या गतीने गोलंदाजी करतोय ते लक्षवेधी ठरताना दिसते.
IPL 2025 : विदर्भाचा 'बिग हिटर' IPL मुळे 'मालामाल' झाला हे खरंय पण...
यंदाच्या हंगामातील पहिली विकेट्स घेत रचला अनोखा विक्रम
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याला पहिली संधी मिळाली. या सामन्यात २ षटकात १७ धावा खर्च करून त्याला एकही विकेट घेता आली नव्हती.. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध त्याने विकेट यंदाच्या हंगामातील विकेट्सचं खाते उघडले. आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदाराची विकेट घेताना त्याने खास कामगिरीची नोंद केली होती. २००८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने तत्कालीन RCB कॅप्टन राहुल द्रविडची विकेट घेतली होती. आता १८ वर्षांनी पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याच फ्रँचायझी कॅप्टनची त्याने शिकार केल्याचे पाहायला मिळाले.
IPL मधील कामगिरी
२००८ च्या पहिल्या हंगामातून कोलकाता नाईट रायडर्सकडून पदार्पण करणाऱ्या इशांत शर्मानं गुजरात टायटन्स आधी दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी या संघाचे प्रतिनिधीत्वही केले आहे. ११५ सामन्यात त्याच्या खात्यात ९६ विकेट्स जमा आहेत. १२ धावा खर्च करून ५ विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. ही कामगिरी त्याने २०११ च्या हंगामात नोंदवली होती. यंदाच्या हंगामात ४ विकेट्स घेत तो आयपीएलमध्ये विकेट्सचं शतक साजरे करणार का? ते पाहण्याजोगे असेल.