आयपीएलच्या १८ व्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या अखेरच्या सामन्यात पुन्हा एकदा १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीचा जलवा पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात १८८ धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यंवशीनं दमदार अर्धशतक झळकावले. याआधी त्याच्या भात्यातून वादळी ३७ चेंडूत वादळी शतक पाहायला मिळाले आहे. यावेळी १४ वर्षांच्या पोराच्या खेळीत परिपक्वता दिसली. त्याने षटकार मारत २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात शेवटपर्यंत थांबून तो संघाला विजय मिळवून देईल, असे वाटत असताना त्याने आपली विकेट गमावली. अनुभवी अश्विनच्या गोलंदाजीवर तो फसला. त्याने ३३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ५७ धावा केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयपीएलचा हंगाम गाजवला, एक नजर त्याच्या खास कामगिरीवर
वैभव सूर्यंवशी याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारून खाते उघडले होते. लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने २० चेंडूत ३४ धावांची खेळी केली होती. आरसीबी विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो १२ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. गुजरात टायटन्स विरुद्ध त्याने ३८ चेंडूत १०१ धावा करत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. शतकी खेळीनंतर मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याला खातेही उघडता आले नव्हते. कोलकाता विरुद्धही तो २ चेंडूत एक चौकार मारून माघारी फिरला. पण त्यानंतर या पोरानं दिमाखात कमबॅक केले. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने १५ चेंडूत फक्त चौकार षटकारांशी डील करत ४० धावा कुटल्या होत्या. यात आता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या ५७ धावांच्या खेळीची भर पडली आहे.
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव