आयपीएलच्या १८ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी धमाकेदार उद्घाटन सोहळा पार पडला. स्पर्धेतील यंदाचं वर्ष खास करण्यासाठी वेगवेगळ्या मैदानातील लढतीआधी रंगारंग कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. ३० मार्चला राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढत गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर पाहायला मिळणार आहे. या लढती आधी होणाऱ्या खास कार्यक्रमात बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीचा जलवा पाहायला मिळणार आहे. तिचं नाव कळल्यावर राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणाऱ्या रियान परागचे जुने प्रकरण चर्चेत आले आहे. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिनेत्रीचं नाव कळल्यावर अनेकांना आठवलं रियानचं जुनं प्रकरण
आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुवाहाटीच्या मैदानात रंगणाऱ्या RR vs CSK यांच्यातील लढती आधी स्टेडियमवर होणाऱ्या खास कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान परफॉमन्स सादर करणार आहे. या अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे त्यामुळे ही गोष्ट आता चर्चेचा विषय ठरत आहे, त्यात तिचं नाव कळल्यावर अनेंकाना रियान परागचं जुनं प्रकरणही आठवले आहे.
रियान परागच्या सर्च हिस्ट्रीमध्ये सारा अली खान, अनन्या पांडे का होत्या? त्याच्याच तोंडून ऐका उत्तर
रियान पराग भलत्याच कारणामुळं आला होता चर्चेत
रियान पराग याला टी-२० आणि वनडेत भारतीय संघाकडून पदार्पणाचीही संधी मिळाली आहे. सध्या तो संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करतोय. सारा अली खान ही खास कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्यामुळे त्याचं जुन प्रकरण चर्चेत आले आहे. गेल्या वर्षी रियान पराग क्रिकेट बाहेरील भलत्याच गोष्टीमुळे चर्चेत आला होता. रियान परागची व्हिडिओ सर्च हिस्ट्री सोशल मीडियावर लीक झाली होती. या क्रिकेटरनं काही बॉलिवूड अभिनेत्रींचे व्हिडिओ शोधताना हॉट व्हिडिओ कीवर्डचा वापर केला होता. यात सारा अली खान हिच्या नावाचाही समावेश होता. त्यामुळेच तो नेतृत्व करत असलेल्या सामन्याआधी तिचा जलवा दिसणार हे कळल्यावर अनेकांना ते जुनं प्रकरण आठवलं आहे.
आयपीएल स्पर्धेत रियान परागच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. पहिल्या दोन पराभवानंतर नंतर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना जिंकून तरी ते खाते उघडणार का? ही गोष्ट चर्चेत असताना रियान आणि सारा अली हे प्रकरण चर्चेत आल्याचे दिसते.