चेन्नई सुपर किंग्जकडून डावाची सुरुवात करताना आयुष म्हात्रेनं पुन्हा एकदा आपल्या भात्यातील फटकेबाजीचा खास नजराणा पेश केला. तुफान फटकेबाजीसह यंदाच्या हंगामातील दुसऱ्या अर्धशतकाच्या दिशेनं वेगाने पाठलाग करत असताना क्वेना माफाकानं अप्रितम झेलसह त्याच्या इनिंगला ब्रेक लावला. आयुष म्हात्रेनं या सामन्यात २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं २० चेंडूत ४३ धावांची दमदार खेळी करत संघाला उत्तम सुरुवात करून दिली. या खेळीत त्याने ८ चौकारांसह एक उत्तुंग षटकारही मारल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सहाव्या सामन्यात गाठला २०० धावांचा पल्ला
१७ वर्षीय आयुष म्हात्रेची चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात लेट एन्ट्री झाली. पण संधी मिळाल्यापासून तो सातत्याने सर्वोत्तम खेळीसह लक्षवेधून घेताना दिसले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. पण राजस्थान विरुद्ध त्याने यातून सावर पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याचे अर्धशतक हुकले असले तरी आयपीएलमध्ये त्याने २०० धावांचा टप्पा पार केला आहे. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात त्याने ४८ चेंडूत ९४ धावांची खेळी केली होती. ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी आहे.
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
क्वेना माफाकानं बेस्ट कॅच घेत लावला आयुष म्हात्रेच्या क्लास खेळीला ब्रेक
आयुष म्हात्रे राजस्थान विरुद्धच्या सामन्यातही मोठ्या खेळीच्या दिशेनं वाटचाल करताना दिसला. पण CSK च्या डावातील सहाव्या षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो फसला. या षटकातील पाचव्या चेंडूवर टायमिंग चुकले अन् क्वेना माफाकाने जबरदस्त कॅचसह त्याच्या खेळीला ब्रेक लावला.
CSK चं मोठं टेन्शन मिटलं
बदली खेळाडूच्या रुपात आलेल्या आयुष म्हात्रेनं यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातून चेन्नईकडून पदार्पण केले. या सामन्यात त्याने १५ चेंडूत ३२ धावांची खेळी केली होती. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने १९ चेंडूत ३० धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. पंजाब किंग्ज विरुद्ध ७ धावावर बाद झाल्यावर आरसीबी विरुद्ध त्याने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च ९४ धावांची खेळी साकारली. त्याच्या रुपात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला आगामी हंगामासाठी एक तगडा गडीच मिळाला आहे.