आरसीबीविरुद्ध कर्णधार अक्षर पटेलकडून कुठे झाली चूक? दिल्लीच्या पराभवाची २ प्रमुख कारणे समोर!

IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला सहा विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:29 IST2025-04-28T13:28:21+5:302025-04-28T13:29:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Royal Challengers Bengaluru won by 6 wkts Agaist Delhi Capitals | आरसीबीविरुद्ध कर्णधार अक्षर पटेलकडून कुठे झाली चूक? दिल्लीच्या पराभवाची २ प्रमुख कारणे समोर!

आरसीबीविरुद्ध कर्णधार अक्षर पटेलकडून कुठे झाली चूक? दिल्लीच्या पराभवाची २ प्रमुख कारणे समोर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी संथ गतीने फलंदाजी केल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनीही निराशाजक प्रदर्शन केले. याशिवाय, अक्षर पटेलने घेतलेल्या दोन चुकीच्या निर्णयामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. 

या सामन्यात आरसीबीच्या संघाला अखेरच्या दोन षटकांत १६ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी आरसीबीकडून टीम डेव्हिड आणि क्रुणाल पांड्या फलंदाजी करत होते. अशावेळी अक्षर पटेलने मिचल स्टार्क आणि दुष्मंथा चमिरा यांच्याऐवजी चेंडू मुकेश कुमारच्या हातात सोपवला. मिचल स्टार्क आणि दुष्मंथा चमिरा यांचे प्रत्येकी एक-एक षटक शिल्लक होते, ज्यांना डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याचा चांगला अनुभव आहे. परंतु, अक्षरने १९ व्या षटकात मुकेश कुमारची निवड केली, ज्याने आधीच खूप धावा खर्च केल्या होत्या.

आरसीबीने १९ व्या षटकातच सामना जिंकला
दरम्यान, १९ व्या षटकात मुकेश कुमारच्या पहिल्या चेंडूवर टीम डेव्हिडने षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही त्याने चौकार मारला, जो नो बॉल ठरला. फ्री हिटवरही पुन्हा त्याने चौकार मारला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरही त्याने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. अशाप्रकारे आरसीबीने १९ व्या षटकातच सामना जिंकला. मुकेश कुमारने ३.३ षटकांत ५१ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखवणे महागात पडले
या सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांना अधिक मदत मिळत होती. अशावेळी फिरकी गोलंदाजांकडून गोलंदाजी करून घेणे अपेक्षित होते. पंरतु, दिल्लीच्या विपराज निगमने फक्त एक षटक गोलंदाजी केली. कुलदीप यादवने त्याच्या चार षटकांमध्ये फक्त २८ धावा दिल्या. आरसीबीचे फिरकीपटू सुयश शर्मा आणि कृणाल पांड्या यांनीही सामन्यात शानदार गोलंदाजी केली. तरीही अक्षर पटेलने वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखवला. 

दिल्लीची फ्लॉफ फलंदाजी
दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना एकूण १६२ धावा केल्या. मधल्या षटकांत दिल्लीच्या फलंदाजांनी संथ गतीने फलंदाजी केली. केएल राहुलने ३९ चेंडूत ४१ धावा केल्या. तर, फाफ डू प्लेसिसने २६ चेंडूत २२ धावा केल्या. दुसरीकडे, आरसीबीकडून विराट कोहली आणि क्रुणाल पांड्याने अर्धशतक झळकवले. कोहलने ५१ धावांची खेळी केली. तर, क्रुणाल पांड्याने ४७ चेंडूत ७३ धावा केल्या, ज्यात पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. 

Web Title: IPL 2025 Royal Challengers Bengaluru won by 6 wkts Agaist Delhi Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.