मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर संघाने चेन्नई सुपरकिंग्जचा ९ विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन करण्यात आले. या सेलीब्रेशनदरम्यान, मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स महिला जयवर्धनेने रोहित शर्माबद्दल असा एक शब्द वापरला, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
गेल्या अनेक सामन्यांपासून खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या रोहित शर्माने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ४५ चेंडूत ७६ धावा केल्या. यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले. चेन्नईविरुद्धचा सामना मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, ज्यात रोहित शर्माने दमदार कामगिरी करून दाखवली. सध्या सोशल मीडियावर मुंबई इडियन्सच्या ड्रेसिंग रूमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात महिला जयवर्धनने रोहित शर्माच्या खेळीचे कौतुक करताना त्याला 'मॅव्हरिक' असे म्हटले.
जयवर्धने काय म्हणाला?
जयवर्धने म्हणाला की, 'यंदाच्या हंगामात रोहितने बॅटने कुमकुवत खेळ केला होता. पंरतु, चेन्नईविरुद्धची त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. पॉलिने काहीतरी खास मागितले आणि तुम्ही सर्वांनी ते दिले. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता, तेव्हा तुम्हाला थोडे कठीण अनुभव येतात. तुमच्या डोक्यात वेगळे विचार सुरू असतात. पण मॅव्हरिक रोहित शर्मा चांगला खेळला.
सहा सामन्यात फक्त ८२ धावा
चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहित शर्माला एकाही सामन्यात ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्याला एकूण सहा सामन्यात फक्त ८२ धावा करता आल्या. रोहित शर्मा मुंबईच्या वरच्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. पुढेही संघाला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
मुंबईचा चेन्नईवर ९ विकेट्सने विजय
मुंबईच्या वानखेडेवर काल खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. शिवम दुबे, रवींद्र जाडेजा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने मुंबईसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने ९ विकेट्स आणि चार षटक शिल्लक ठेवून सामना जिंकला.
Web Title: IPL 2025 Rohit Sharma gets new nickname From Mahela Jayawardene after MI vs CSK
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.