Join us

IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?

लवकरच बीसीसीआय नवे वेळापत्रक जाहीर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:34 IST

Open in App

भारत-पाक यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासाठी बीसीसीआयने जुळवाजुळव सुरु केली आहे. सीमारेषेवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्दकेल्यावर उर्वरित स्पर्धा आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आली होती. स्पर्धा स्थगित झाल्यावर अनेक फ्रँचायझी संघातील परदेशी खेळाडू आपापल्या घरी परतल्याचेही समजते. १३ मे रोजी म्हणजेच मंगळवारपर्यंत आपल्या सर्व खेळाडूंना एकत्रित करावे, अशी सूचना बीसीसीआयने फ्रँचायझी संघांना तोंडी स्वरुपात दिल्याची माहिती समोर येत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?

आयपीएल स्पर्धा लवकरात लवक सुरु करून ठरलेल्या वेळेतच स्पर्धा पार पाडण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील दिसते. यासाठी बीसीसीय नव्या वेळापत्रकात डबल हेडरचा पर्याय निवडू शकते. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचा रद्द झालेला सामना सोडून साखळी फेरीत अद्यापही १२ सामने खेळवणं बाकी आहे. त्यानंतर प्लेऑफ्सच्या चार लढती नियोजित आहेत. यंदाच्या हंगामातील फायनल लढत ही २५ मेला नियोजित आहे. साखळी फेरीतील सामने डबल हेडरच्या स्वरुपात खेळवून प्लेऑफ्समधील सामन्याचे वेळापत्रक कायम ठेवण्याचा बीसीसीआयचा मानस दिसतो. त्याच गणित ते कसे जुळवून आणणार ते पाहण्याजोगे असेल.

गौतम गंभीरलाही वाटते की..., विराटच्या निवृत्तीसंदर्भातील चर्चेत आणखी एका गोष्टीची भर

पंजाब किंग्जचे उर्वरित सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार    इंडियन एक्‍सप्रेसच्या वृत्तानुसार, " पंजाबचा संघ वगळता सर्व फ्रँचायझी संघांना आपापल्या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यास सांगण्यात आले आहे.  पंजाब फ्रँचायझीला वगळण्यामागचं कारण म्हणजे त्यांचे उर्वरित सामने ते तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. हे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. डबल हेडरच्या माध्यमातून ठरलेल्या वेळेत स्पर्धा पार पाडण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. भारत-पाक यांच्यात शस्त्रसंधीची घोषणा झाल्यावर लवकरात लवकर स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासंदर्भात विचार करत आहोत, असे आयपीएल अध्यक्ष अरुण धूमल यांनीही स्पष्ट केले होते. आता आयपीएल आयोजक त्याच्या तयारीला लागल्याचे दिसते. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५इंडियन प्रीमिअर लीगपंजाब किंग्समुंबई इंडियन्सबीसीसीआय