IPL 2025 RCB vs SRH 65th Match Player to Watch Bhuvneshwar Kumar Josh Hazlewood Royal Challengers Bengaluru : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील यांच्यातील साखळी फेरीतील ६५ वा सामना बंगळुरुहून लखनौच्या मैदानात स्थलांतरित करण्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने यंदाच्या हंगामात घरच्या मैदानातील कामगिरीच्या तुलनेत बाहेरच हवा केलीये. त्यामुळेच खराब हवामानामुळे सामन्याच्या ठिकाणात झालेला बदल हा RCB ला अनुकूल असलेल्या वातावरणातच रंगणार आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
SRH च्या तगड्या फलंदाजांसमोर SRH या दोन गोलंदाजांचे असेल मोठे आव्हान
स्फोटक बॅटिंग ऑर्डर असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडे या सामन्यात गमावण्यासारखं तसे काहीच नाही. पण बंगळुरुच्या संघासाठी या सामन्यात कमावण्यासारखं खूप काही आहे. हा सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ प्लेऑफ्समध्ये अव्वल दोनमध्ये राहण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. SRH च्या तगड्या फलंदाजीला सुरुंग लावण्यासाठी RCB च्या ताफ्यातील जोश हेजलवूड आणि भुवनेश्वर कुमार हे दोन भिडू कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
RCB च्या ताफ्यातील सर्वात यशस्वी गोलंदाज
जोश हेजलवूड हा यंदाच्या हंगामात RCB च्या ताफ्यातील सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला आहे. १० सामन्यात त्याने १८ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्यात. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातील फोर विकेट्स हॉलसह चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज संघाविरुद्ध जोश हेजलवूडनं प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यातही त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षा असेल.
भुवनेश्वर कुमारचा अनुभवही येईल कामी, SRH सोबत खास कनेक्शन
भुवनेश्वर कुमारही या सामन्यात लक्षवेधी असेल. ज्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे ११ वर्षे प्रतिनिधीत्व केले त्या संघाविरुद्ध भुवी आपला अनुभव पणाला लावताना दिसेल. यंदाच्या हंगामात भुवीनं १० सामन्यात १२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. गत हंगामाच्या तुलनेत त्याने एक विकेट अतिरक्त घेतलीये. दोन सामने वगळले तर प्रत्येक सामन्यात त्याने संघाला यश मिळवून दिले आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ४ षटकात ३३ धावा खर्च करत ३ विकेट्स ही यंदाच्या हंगामातील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा जलदगती गोलंदाज आहे. १८६ सामन्यात त्याने १९३ विकेट्स आपल्या नावे केल्यात. साखळी फेरीतील उर्वरित दोन सामन्यांसह प्लेऑफ्समधील लढतीत सर्वोत्तम कामगिरी करून आणखी ७ विकेट्स घेत त्याच्याकडे 'द्विशतकी' डाव साधण्याचीही संधी आहे.