Join us

IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)

Shreyas Iyer Wicket Celebration: श्रेयस अय्यरची विकेट म्हणजे मॅचचा एक मोठा टर्निंग पॉइंटच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 23:04 IST

Open in App

Shreyas Iter Wicket Video: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएलच्या १८ व्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्जच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला १९० धावांवर रोखले. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाने चांगली सुरुवात केली. पण ७२ धावांवर दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. या दोन विकेट्स गमावल्यावर पंजाबच्या सर्व नजरा या श्रेयस अय्यरवर खिळल्या होत्या. अहमदाबादच्या मैदानात त्याचा रेकॉर्डही दमदार होता. पण तो फक्त एक धावेची भर घालून बाद झाला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

श्रेयसची विकेट पडली अन् आरसीबीच्या ताफ्यात ऊर्जा दिसली

 श्रेयस अय्यरची विकेट म्हणजे मॅचचा एक मोठा टर्निंग पॉइंटच होता. फायनल लढतीत पंजाबचा संघ मजबूत स्थितीत असल्याचे वाटत असताना १० व्या षटकात रजत पाटीदार याने रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd) च्या हाती चेंडू सोपवला. या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने पंजाबच्या कॅप्टनची विकेट घेत सामना आरसीबीच्या बाजूनं झुकवला. या विकेटनंतर आरसीबीच्या ताफ्यात एकच जल्लोष पाहायला मिळाला. ही विकेट मिळाली म्हणजे ट्रॉफीचा मार्ग मोकळा झालाय अशाच अंदाजात त्यांनी सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीनं आक्रमक अंदाजासह क्रुणाल पांड्याचे तेवरही बघण्याजोगे होते.  

RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला

गोलंदाजांना मिळालं बळ

श्रेयस अय्यर हा यंदाच्या हंगामात धमाकेदार अंदाजात खेळताना दिसला आहे. पण फायनल सामन्यात मोक्याच्या क्षणी त्याने विकेट गमावली. पंजाबच्या ताफ्यात त्याच्यानंतरही चांगले फंलदाज आहेत. पण अय्यरची विकेट ही आरसीबीच्या गोलंदाजांना बळ देणारी आणि सामन्यात पुन्हा आणणारी अशीच होती. त्यामुळेच संघातील खेळाडूंनी या विकेटनंतर मोठा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्सश्रेयस अय्यरविराट कोहली