IPL 2025 RCB vs PBKS Final Virat Kohli Fans : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यासाठी मोठ्या संख्येनं चाहते स्टेडियमवर पोहचले आहेत. दोन्ही संघ पहिली ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरणार आहेत. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानला जात आहे. कारण पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांनी पंजाब किंग्जलाच पराभूत केले होते. पण श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने पाच वेळच्या चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सला पराभूत करत आपली ताकद दाखवलीये. त्यामुळे हा सामना क्वालिफायर १ च्या तुलनेत रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB चाहत्यांची तौबा गर्दी! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम बाहेर उसळला 'लाल समुद्र'
RCB च्या चाहत्यांनी आपल्या संघासाठी खास माहोल केला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबीच्या जर्सीतील चाहत्यांची तौबा गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले. चाहत्यांच्या गर्दीमुळे स्टेडियम बाहेर अक्षरश: लाल समुद्र उसळल्याचे चित्रच निर्माण झाल्याचे दिसून आले. आरसीबीच्या संघाने आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकली नसली तरी त्यांनी मोठा चाहता वर्ग कमावला आहे. आता संघ पुन्हा फायनलमध्ये पोहचल्यावर चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येतोय.
IPL 2025 : ३ फायनलमध्ये फक्त १ फिफ्टी अन् १७ वर्षांत 'ती' एकदाही नाही भेटली!
१८ व्या हंगामात १८ नंबर जर्सीचा जलवा दिसणार?
आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने चौथ्यांदा फायनल गाठली आहे. याआधी विराट कोहलीच्या नेतृत्वासह संघाने तीन वेळा फायनलपर्यंत मजल मारली आहे. पण ट्रॉफीच स्वप्न अजूनही अधूर आहे. १८ क्रमांकाच्या जर्सीतील विराट कोहलीचा संघ यंदाचा हंगाम गाजवत १८ व्या हंगामात हा दुष्काळ संपवेल, अशी आस चाहत्यांना आहे.
सोशल मीडियावरही आरसीबीची हवा
स्टार स्पोर्ट्सनं सोशल बझच्या माध्यमातून घेतलेल्या सर्व्हेनुसार, फायनल सामन्यात आरसीबीचा संघ प्रबळ दावेदार असल्याचे दिसून येते. ६७ टक्के क्रिकेट चाहत्यांनी आरसीबी फायनल बाजी मारेल, असे मत व्यक्त केले आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जच्या बाजूनं फक्त ३३ टक्के चाहते आहेत.