IPL 2025 RCB vs PBKS Final Phil Salt has returned to Ahmedabad : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील फायनल लढतीआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्या क्वालिफायर लढतीनंतर मायदेशी परतलेला फिल सॉल्ट फायनलसाठी पहाटे ३ वाजता इंग्लंडवहून अहमदाबमध्ये पोहचला आहे. सराव सत्रामधून तो गायब झाल्यावर तो फायनल खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ऑस्ट्रेलियन बॅटरनं विराट कोहलीसोबत डावाची सुरुवात करताना स्फोटक अंदाजात फलंदाजी केली आहे. क्वालिफायरच्या पहिल्या लढतीतही त्याने अर्धशतकी खेळीसह धमाकेदार कामगिरी केली होती. पण या सामन्यानंतर तो इंग्लंडला परतला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
क्वालिफायरमधील लढतीनंतर तो का परतला होता मायदेशी?
वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार, फिल सॉल्टची लाँग टाइम गर्लफ्रेंड अबी मॅक्लेव्हन () ही प्रेग्नंट आहे. त्यामुळेच तो घरी गेला होता. पण फायनल खेळण्यासाठी तो पुन्हा संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. पहाटे ३ वाजता तो इंग्लंडहून अहमदाबादला पोहचल्याचे समजते.
IPL 2025 : ३ फायनलमध्ये फक्त १ फिफ्टी अन् १७ वर्षांत 'ती' एकदाही नाही भेटली!
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी
फिल सॉल्ट याने विराट कोहलीसोबत RCB च्या डावाची सुरुवात करताना जबरदस्त कामगिरी करून दाखवलीये. १२ सामन्यात त्याने ३५ च्या सरासरीसह १७५ च्या स्ट्राइक रेटनं ३८७ धावा कुटल्या आहेत. क्वालीफायर-१ च्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने २७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५६ धावांची खेळी केली होती.
कोण आहे फिल सॉल्टची गर्लफ्रेंड अॅबी मॅकलॅव्हन ?
RCB च्या ताफ्यातून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज फिल सॉल्टची लाँग टाइम गर्लफ्रेंड अॅबी मॅकलॅव्हन(Abi McLaven) इंग्लंडमधील मँचेस्टर येथे राहणारी एक ब्रिटिश नागरिक आहे. नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातून तिने उच्चशिक्षण घेतले आहे. ती द असिस्ट एजन्सीमध्ये फ्रीलान्स व्हर्च्युअल असिस्टंटच्या रुपात काम करते. फिल साल्टसोबत २०२० पासून ती रिलेशनशिपमध्ये आहे. चार वर्षांच्या डेटिंगनंतर, दोघांनीही इन्स्टाग्राम अकाउंटवरून साखरपुड्याची घोषणा केली होती. पण अद्याप या जोडीनं लग्न केलेले नाही.
Web Title: IPL 2025 RCB vs PBKS Final Phil Salt has returned to Ahmedabad this morning after having gone home for the birth of his child
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.