IPL 2025 : 'विराट' प्रेमापायी मनी होती RCB ची ओढ! मग त्याच्या 'स्वप्नात' आली 'पंजाबी कुडी'

ट्रॉफी जिंकण्याचं त्याचं हे स्वप्न कायम आहे पण त्याला ज्या संघासाठी आणि ज्या चेहऱ्यासाठी IPL ट्रॉफी जिंकायची होती त्यात बदल झालाय.

By सुशांत जाधव | Updated: April 18, 2025 13:11 IST2025-04-18T13:07:20+5:302025-04-18T13:11:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Lokmat Player to Watch Priyansh Arya Punjab Kings | IPL 2025 : 'विराट' प्रेमापायी मनी होती RCB ची ओढ! मग त्याच्या 'स्वप्नात' आली 'पंजाबी कुडी'

IPL 2025 : 'विराट' प्रेमापायी मनी होती RCB ची ओढ! मग त्याच्या 'स्वप्नात' आली 'पंजाबी कुडी'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Player to Watch Priyansh Arya Punjab Kings : पंजाब किंग्जच्या ताफ्यातील सलामीवीर प्रियांश आर्य याने पदार्पणाच्या हंगामात आपली खास छोप सोडलीये. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एका षटकात ६ षटकार मारून  युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी करत त्याने सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. या खेळीमुळे तो प्रकाश झोतात आला अन् आता तो आयपीएलचा स्टारही झालाय. पण तुम्हाला माहितीये का? पंजाब किंग्जच्या ताफ्यातून मैदानात उतरणाऱ्या प्रियांश आर्य याला आयपीएलमध्ये RCB कडून खेळायचे होते. एवढेच नाही तर विराट कोहलीच्या संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटाही उचलायचा होता. ट्रॉफी जिंकण्याचं त्याचं हे स्वप्न कायम आहे पण त्याला ज्या संघासाठी आणि ज्या चेहऱ्यासाठी IPL ट्रॉफी जिंकायची होती त्यात बदल झालाय. त्याच्या  स्वप्नात पंजाबी कुडी प्रीती झिंटाची एन्ट्री झालीये. कारण मेगा लिलावात मोठा डाव लावून पंजाब किंग्जच्या संघानं या नव्या चेहऱ्याला आपला मोहरा केलं होते.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

विराटमुळे RCB चां संघ झाला आवडीचा; अन्...

दिल्ली प्रीमियर लीगमध्ये धमाका केल्यावर IPL मेगा लिलावात प्रियांश आर्य याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी 'बोली युद्ध' रंगणार हे फिक्स होते. त्यामुळेच त्याला यासंदर्भातील प्रश्नही लिलावाआधी विचारण्यात आले होते. आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल? या प्रश्नाचे उत्तर देताना विराट कोहली हा आवडता खेळाडू असून RCB संघाकडून खेळण्याची इच्छा आहे, असे त्याने बोलून दाखवले होते. एवढेच नाही तर RCB ला पहिली ट्रॉफी जिंकून देण्यासाठी मोलाचा वाटा उचलण्याची मनातील इच्छाही त्याने बोलून दाखवली होती.

Video: 'शतकवीर' प्रियांश आर्यचे 'ते' उत्तर अन् हळूच प्रिती झिंटाच्या गालावर पडली खळी

साकार झालेल्या स्वप्नातून अवतरली 'पंजाबी कुडी'

आयपीएल २०२५ च्या स्पर्धेआधी झालेल्या मेगा लिलावात नाव नोंदणी केल्यावर संघ मिळतोच असे नाही. पण प्रियांशला अनसोल्डचा टॅग लागण्याची रिस्कच नव्हती. मुद्दा फक्त एवढाच होता की, आयपीएल खेळण्याचं स्वप्न साकार होताना त्याला संघ कोणता मिळणार?  ३० लाख या मूळ किंमतीसह लिलावात सहभागी झालेल्या प्रियांशवर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सर्वात आधी बोली लावली. या युवा बॅटरवरील बोलीचा आकडा १ कोटींवर पोहचल्यावर पंजाब किंग्जच्या संघानं पॅडेल उचलले. मग RCB चा संघही याता सामील  झाला. पण मेगा लिलावाआधी पर्समध्ये अधिक पैसा बाळगण्याचा प्लॅन पंजाबच्या कामी आला अन् प्रियांशसाठी झालेल्या बिडिंग वॉरमध्ये ३.८० कोटी मोजत PBKS च्या संघानं RCB ला शह दिला. प्रियांशचं स्वप्न साकार होताना पंजाबी कुडी अवतरली तो PBKS चा मोहरा झाला.

IPL च्या पदार्पणातील हंगामात धमाका

प्रियांश आर्य याने गुजरात टायटन्स विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात २३ चेंडूत ४७ धावांची खेळी करत धमाकेदार पदार्पण केले. पहिल्या सामन्यात सिराजचा सामना करताना त्याने पहिला चेंडू निर्धाव खेळल्यावर दोन खणखणीत चौकार मारत आयपीएलच्या रिंगमध्ये नवा किंग आलाय याची झलक दाखवली. हा फक्त ट्रेलर होता. लखनौ  विरुद्धच्या सामन्यात ८ धावांवर तंबूत परतल्यावर राजस्थान विरुद्ध जोफ्राच्या गोलंदाजीवर तो पहिल्याच चेंडूव रबोल्ड झाला. मग झिरो ठरल्यावर त्याच्या भात्यातून हिरोवाली खेळी आली. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध एका बाजूनं ठराविक अंतराने विकेट पडत असताना या फट्ठ्यानं ४२ चेंडूत शतक झळकावले. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात १३ चेंडूतील ३६ धावांची खेळी आणि कोलकाताना विरुद्ध १२ चेंडीतील २२ धावांच्या खेळीतही त्याने आपल्यातील धमक आणि आक्रमक अंदाजात खेळण्याचा तोरा दाखवून दिलाय. RCB ला पहिली ट्रॉफी जिंकून देण्याचं स्वप्न पाहाणारा प्रीतीच्या संघाचे पहिल्या ट्रॉफीचं स्वप्न साकार करण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.

Web Title: IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Lokmat Player to Watch Priyansh Arya Punjab Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.