IPL 2025 RCB vs PBKS 14th Match Player to Watch Sai Sudharsan Gujarat Titans : आयपीएलच्या महासागरातील 'टायटन्स' म्हणजेच गुजरात फ्रँचायझी संघाने २०२२ च्या पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. एवढेच नाही तर २०२३ च्या हंगामातही या संघानं फायनल गाठली होती. हा सुंदर प्रवास या फ्रँचायझीनं हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली अनुभवला. आता आयपीएलचं मैदान गाजवून इथं नव्यानं राज्य प्रस्थापित करण्यासाठी नवा गड्यंवर नजरा असतील. 'टायटन्स'च्या नेव्हिगेशन आणि सुरक्षिततेची जबाबदारी ही प्रामुख्याने टीम इंडियाचा प्रिन्स शुबमन गिलवर आहे. त्याच्याशिवाय जहाजाला न डगमगता पुढे घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी साई सुदर्शनकडेही देण्यात आलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मेगा लिलावाआधी पगारवाढ; IPL च्या यंदाच्या हंगामात बढतीसह मिळाली मोठी जबाबदारी
गुजरात टायटन्सच्या पदार्पणासोबत म्हणजे २०२२ मध्ये साई सुदर्शन याने आपल्या आयपीएल प्रवासाची सुरुवात केली. मागील ३ हंगामात तो २० लाख रुपयांत संघासोबत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आयपीएलच्या तुलनेत तमिळनाडू लोकल टी-२० लीगमधून त्याचा कमाईचा आकडा मोठा होता. लोकल लीगमध्ये Lyca Kovai Kings संघाकडून खेळण्यासाठी त्याला २१.६ लाख एवढी रक्कम मिळाली होती. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी संघानं त्याची मजबूत पगार वाढ केली. त्याला ८.५० कोटींसह रिटेन करण्यात आले आता IPL स्पर्धा सुरु होताच डावाची सुरुवात करण्याची संधी देत बढतीसह त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीये. बटलरसारखा सर्वोत्तम पर्याय असताना साई सुदर्शन गुजरात संघाच्या डावाची सुरुवात करताना दिसतोय.
IPL 2025 GT vs MI : बटलरचा प्रॉपर वापर होणार की, इथंही त्याच्यावर पराभवाचं खापर फुटणार?
IPL च्या चौथ्या सामन्यात पहिलं अर्धशतक, मग उंचावत गेला कामगिरीचा आलेख
२०२२ मध्ये पदार्पणाच्या हंगामात साई सुदर्शनला फक्त ५ सामन्यात संधी मिळाली. विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यावर तिसऱ्या क्रमांकवर तो खेळताना दिसले. पदार्पणातील तीन सामन्यात अडखळल्यावर चौथ्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध ६५ धावांची खेळी करत साई सुदर्शनने या हंगामतील ५ सामन्यात १४५ धावा केल्या. २०२३ च्या हंगाम त्याच्यासाठी आणखी खास राहिला ८ सामन्यात ३ अर्धशतकासह ३६२ धावा करत त्याच्या कामगिरीचा आलेख उंचावला. फायनलमध्ये त्याने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात ४७ चेंडूत ८ चौकार अन् ६ षटकाराच्या मदतीने ९६ धावांची लक्षवेधी खेळी केली होती.
IPL 2025 GT vs PBKS : 'दिल का अन् गिल का मामला'; नेतृत्वाची ट्रायल झाली, आता धमक दाखवण्याची वेळ!
गत हंगामातील फॉर्म घेऊनच उतरलाय मैदानात
गत हंगामात १२ सामन्यात साई सुदर्शन याने १२ सामन्यात ५२७ धावा काढल्या होत्या. यात दोन अर्धशतकासह एका शतकी खेळीचा समावेश होता. २०२४ च्या हंगामात चेन्नईविरुद्ध तो शेवटचा सामना खेळला. या सामन्यात त्याने ५१ चेंडूत २०१.९६ च्या स्ट्राइक रेटनं १०३ धाव कुटल्या. हाच फॉर्म घेऊन त्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात केलीये. यंदाच्या हंगामता पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ४१ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७४ धावा कुटल्यावर मुंबई इंडियन्सविरुद्धही त्याच्या भात्यातून ६३ धावांची खेळी पाहायला मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध यंदाच्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात तो आणखी एक धमाकेदार खेळी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. गत हंगामात एम चिन्नास्वामी बंगळुरुच्या मैदानात त्याच्या भात्यातून ४९ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. हा रेकॉर्ड तो इथं मोठा धमाका करू शकतो याचे संकेतच आहेत.