IPL 2025 : RCB सह किंग कोहलीसाठी मॅच ठरेल खास, कारण...

कोहलीवरील चाहत्यांचे प्रेम अन् खास बंगळुरुच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर एक वेगळी फ्रेम ठरेल लक्षवेधी ठरेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:08 IST2025-05-17T13:01:08+5:302025-05-17T13:08:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 RCB vs KKR 58th Match Lokmat Player To Watch Virat Kohli Delhi Capitals Royal Challengers Bengaluru | IPL 2025 : RCB सह किंग कोहलीसाठी मॅच ठरेल खास, कारण...

IPL 2025 : RCB सह किंग कोहलीसाठी मॅच ठरेल खास, कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 RCB vs KKR 58th Match Player To Watch Virat Kohli Royal Challengers Bengaluru: भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा सुधारित वेळापत्रकानुसार पुन्हा रंगणार आहे. ज्या दोन संघांनी  यंदाच्या हंमाची सुरुवात केली तेच दोन संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ५८ वा सामना खेळवण्यात येणार आहे. बंगळुरुच्या मैदानात रंगणाऱ्या हा सामना RCB सह विराट कोहलीसाठी एकदम खास असेल. जाणून घेऊयात त्यामागची कारणं...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

RCB च्या संघानं मैदान मारलं तर त्यांच प्लेऑफ्सच तिकीट होईल पक्के

आयपीएल स्पर्धेत १० संघ सहभागी झाल्यापासून १६ गुण प्लेऑफ्ससाठी पुरेसे ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. पण यंदाच्या हंगामात ही शर्यत खूपच रंगतदार झालीये. १६ गुणांपर्यंत पोहचूनही RCB च्या नावासमोर प्लेऑफ्ससाठी क्वालिफाय (Q) टॅग लागलेला नाही. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना जिंकला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ यंदाच्या हंगामात प्लेऑफ्ससाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरू शकतो. या लढतीवेळी घरच्या मैदानातील माहोलही खास असणार आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा विराट कोहली या मॅचमध्ये खास कारणामुळे चर्चेत येईल.  

उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT

कोहलीसाठी टी-२० मॅचमध्ये पाहायला मिळणार 'टेस्ट'चा माहोल

भारतीय क्रिकेटची शान अन् RCB चा अभिमान असणारा विराट कोहली याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये. किंग कोहलीनं मोठ्या फॉर्मेटमधील १४ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास थांबवत असल्याची घोषणा सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून केली होती. त्याने अचानक घेतलेला हा निर्णय चाहत्यांची घोर निराशा करणारा असा आहे. या एका निर्णयामुळे अगदी टप्प्यात असणारे अनेक मोठे विक्रम विराट कोहलीपासून दूर गेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा पल्ला गाठणंही आता त्याच्यासाठी मुश्किल झाले आहे. हे चर्चित मुद्दे  बाजूला ठेवून चाहते कसोटीतील अविश्वसनीय प्रवासाबद्दल कोहलीसाठी बंगळुरुच्या स्टेडियमवर 'टेस्ट'वाला माहोल निर्माण करणार आहेत. रेड जर्सीत RCB ला चीअर करणारी मंडळी व्हाइट आउटफिट्समध्ये मैदानात जमणार आहेत. कोहलीवरील चाहत्यांचे प्रेम अन् खास बंगळुरुच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर एक वेगळी फ्रेम लक्षवेधी ठरेल.

किंग कोहलीची यंदाच्या हंगामातील कामगिरी

विराट कोहली हा यंदाच्या हंगामात कमालीची कामगिरी करताना दिसून आले आहे. ११ सामन्यातील ११ डावात संघाच्या डावाची सुरुवात करताना त्याने ५०५ धावा केल्या आहेत. पुन्हा एकदा तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दिसतोय. यंदाच्या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक ७ अर्धशतके ही कोहलीच्या भात्यातूनच आली आहेत. उर्वरित सामन्यात हाच तोरा कायम ठेवत १८ व्या हंगामात १८ नंबर जर्सी ट्रॉफी जिंकणार का? ते पाहण्याजोगे असेल.
 

Web Title: IPL 2025 RCB vs KKR 58th Match Lokmat Player To Watch Virat Kohli Delhi Capitals Royal Challengers Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.