Join us

RCB vs DC : केएल राहुल भारीच खेळला! पण या २० वर्षांच्या पोरामुळं विराटसह आरसीबीचा संघ फसला!

केएल राहुलशिवाय आणखी एक चेहरा आहे ज्याच्यामुळे विराट कोहलीसह आरसीबीचा संघ खऱ्या अर्थानं फसला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 01:17 IST

Open in App

IPL 2025 RCB vs DC  Who is Vipraj Nigam Gets Virat Kohli Wicket First Time : दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं बंगळुरुच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दिलेल्या धावांचा यशस्वी पाठलाग करत यंदाच्या हंगामातील सलग चौथा विजय नोंदवला. संघ अडचणीत असताना लोकेश राहुलच्या भात्यातून ९३ धावांची मॅच इनिंग खेळी आली. नाबाद खेळीसह तो सामनावीरही ठरला. पण  केएल राहुलशिवाय आणखी एक चेहरा आहे ज्याच्यामुळे विराट कोहलीसह आरसीबीचा संघ खऱ्या अर्थानं फसला. तो चेहरा म्हणजे विपराज निगम. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कोण आहे विपराज निगम? 

२० वर्षीय विपराज निगम पहिल्यांदा आयपीएलच्या मैदानात उतरला आहे. उत्तर प्रदेशमधील लोकल लीगमध्ये तो लखनऊ फाल्कन्स संघाकडून खेळायचा. आपल्या अष्टपैलू खेळीची छाप सोडत त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. बॉलिंग ऑलराउंडर असलेला हा युवा खेळाडू उजव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजीसह उजव्या हाताने फलंदाजी करताना मोठे फटकेबाजी करण्याची क्षमता पाहून दिल्ली कॅपिचल्सच्या संघानं ५० लाख रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. लखनौ विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने २ षटकात ३५ धावा खर्च करत एक विकेट घेतली होती. याशिवाय १५ चेंडूत ३९ धावांची दमदार खेळीही केली होती.

IPL 2025 : लोकल टी-२० लीगमधून येऊन आयपीएलमध्ये छाप सोडणारे ५ नवे चेहरे

RCB विरुद्ध बॅटिंगचा नंबर नाही आला, पण फिल्डिंगसह गोलंदाजीत सोडली छाप

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात विपराज निगम याने दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात सिंहाचा वाटा उचललाय असं म्हटलं तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण तुफान फटकेबाजी करणाऱ्या फिल सॉल्टला त्यानेच रन आउट केले. एवढेच नाही तर गोलंदाजीला आल्यावर वैयक्तिक दुसऱ्या षटकात विराट कोहलीनं त्याला षटकार मारला. पण याच षटकात त्याने विराट कोहलीची विकेट घेतली. अनकॅप्ड खेळाडूसाठी ही विकेट आयुष्यभर लक्षात राहणारी अशीच आहे.  या दोन विकेट्स  मॅचचा एक टर्निंग पाँइंटच होता.  ४ षटकात १७ धावा खर्च करताना विराट कोहलीसह त्याने क्रुणाल पांड्याची विकेटही घेतली.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५दिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीलोकेश राहुलअक्षर पटेलइंडियन प्रीमिअर लीग