Virat Kohli 1000 Boundaries Record : बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने नवा इतिहास रचला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने सर्वाधिक बाउंड्री मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून विराट कोहली RCB च्या संघाकडून खेळत आहे. घरच्या मैदानावर खेळताना कोहलीच्या भात्यातून मोठी खेळी आली नाही. पण छोट्याखानी खेळीसह त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हजार बाउंड्रीसह सेट केला नवा रेकॉर्ड
२५७ आयपीएल सामन्यांत किंग कोहलीच्या भात्यातून ७२१ चौकार आणि २८० षटकार आल्याचे पाहायला मिळाले आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत १००० बाउंड्री मारणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे. सर्वाधिक षटकाराच्या बाबतीत ख्रिस गेल (३५७) आणि रोहित शर्मा (२८२) त्याच्यापेक्षा पुढे आहेत.
Phil Salt Run Out : विराटनं धाव घेण्यास दिला नकार; मागे फिरताना पाय घसरला अन् सॉल्ट झाला 'रन आउट'
अर्धशतकांचे शतक लांबणीवर
विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याला टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतकांचे शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण घरच्या मैदानात मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. या सामन्यात तो १४ चेंडूत एक चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २२ धावा करून बाद झाला. पुढच्या सामन्यात तो हा मोठा डावही साधेल, अशी अपेक्षा आहे. आणखी एक अर्धशतकासह तो वॉर्नरनंतर टी-२० क्रिकेटजगतात अर्धशतकांचे शतक साजरे करणारा तो दुसरा फलंदाज ठरेल.