Join us

IPL 2025 : काव्या मारनच्या संघासाठी कमी पैशात राबला; 'घरवापसी'सह किंमत वाढली अन् हिंमतही दाखवली

सलग दोन हंगामात पर्पल कॅप मिळण्याचा विक्रम नावे असलेला भुवी IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा जलगती गोलंदाज ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:11 IST

Open in App

IPL 2025 RCB vs DC 24th Match Player to Watch Bhuvneshwar Kumar Royal Challengers Bengaluru : आयपीएलच्या इतिहासात काही असे खेळाडू आहेत ज्यांनी कमालीच्या कामगिरीसह सेट केलेला रेकॉर्ड मोडणं खूपच मुश्किल वाटते. अशक्यप्राय कामगिरीसह आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारचेही नाव आहे. आयपीएलमध्ये सलग दोन हंगामात पर्पल कॅप मिळवणारा तो एकमेव गोलंदाज आहे. २०१७ आणि २०१८ च्या हंगामात त्याने ही अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली होती. पण ज्या संघाकडून त्याने ही कामगिरी केली त्या संघाला त्याची किंमत कळलीच नाही. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

काव्या मारनच्या SRH संघाकडून छाप सोडली, पण RCB कडून झाली मोठी पगार वाढ

११ वर्षे काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मैदानात उतरला. या कालावधीत त्याने कमालीची कामगिरीही करून दाखवली. कामगिरीच्या तुलनेत त्याला या फ्रँचायझीकडून योग्य मोबदला मिळाला नाही. सुरुवातीच्या काही हंगामात ८.२५ कोटींचे पॅकेज दिल्यावर या फ्रँयाचझी संघाने त्याला ४.२० कोटींच्या पॅकेजवर आणून ठेवले होते. यंदाच्या हंगामात घरवापसी केल्यावर RCB कडून त्याला IPL मध्ये आतापर्यंत सर्वाधिक पगार मिळालाय. मेगा लिलावात आपल्या जुन्या गड्यासाठी RCB नं १०.७५ कोटी रुपये मोजले आहेत. 

IPL 2025 Video: आशिष नेहराने दिला 'कानमंत्र'; लगेचच प्रसिध कृष्णाने घेतली संजू सॅमसनची विकेट

ना RCB.. ना SRH... भुवीनं या संघाकडून केलं होतं IPL मध्ये पदार्पण

२००८-०९ च्या हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप सोडत भुवीनं सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. आयपीएल फ्रँचायझी बंगळुरुच्या  संघानं २००९ च्या हंगामासाठी त्याला करारबद्ध केले. दोन वर्षे तो या संघासोबत राहिला. पण त्याला या संघाकडून IPL पदार्पणाची संधी काही मिळाली नाही. २००९ च्या हंगामात चॅम्पियन्स प्रीमियर लीगमध्ये तो RCB च्या जर्सीत मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. २०११ मध्ये भुवीनं पुणे वॉरियर्स संघाकडून त्याने पंजाबविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला होता. या सामन्यात त्याने २ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटाही उचलला होता.

दमदार रेकॉर्ड, तरीही SRH नं दाखवला नाही भरवसा 

सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळताना २०१६ च्या हंगामात १७ लढतीत २३ विकेट्स आणि २०१७ च्या हंगामात १४ सामन्यात २६ विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळताना २०१६ च्या हंगामात १७ सामन्यात २३ विकेट्स आणि २०१७ च्या हंगामात १४ सामन्यात २६ विकेट्स ही  त्याची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी आहे.  २०१४ ते २०१७ आणि २०२३ च्या हंगामात भुवी हा सनरायझर्स हैदराबादकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. तरीही त्याच्यावर भरवसा न दाखवता SRH नं अनुभवी खेळाडूला रिलीज केल्याचे पाहायला मिळाले.

RCB च्या ताफ्यात आला अन् इतिहास रचला

याआधी तो रॉयल चॅलेंजर्सचा भाग असला तरी IPL मध्ये या संघाकडून पदार्पणाची संधी त्याला यंदाच्या हंगामात मिळाली. ज्या ३ सामन्यात खेळता त्यात त्याने प्रत्येकी एक विकेट घेत आपला अनुभव संघासाठी उपयुक्त ठरेल, याची हमी दिली. एवढेच नाही एका विकेटसह सामन्याला कलाटणी देण्याची आपली क्षमताही त्याने दाखवली. मुंबई इंडियन्स विरुद्ध तिलक वर्माची विकेट घेत त्यानेच सामना फिरवला होता. या विकेटसह आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा तो जलदगती गोलंदाज ठरला. १७९ सामन्यात त्याच्या खात्यात १८४ विकेट्स जमा झाल्या आहेत. याआधी हा विक्रम ड्वेन ब्रावोच्या नावे होता. ज्याने १६१ आयपीएलमध्ये १८३ विकेट्स घेतल्या आहेत. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्सभुवनेश्वर कुमारइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट