IPL 2025 RCB vs CSK 52nd Match Player to Watch Khaleel Ahmed Chennai Super Kings : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ५२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज एकमेकांना भिडणार आहेत. चेन्नईचा संघ आधीच स्पर्धेतून बाद झाला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्सचा संघ बंगळुरुच्या घरच्या मैदानात रंगलेला सामना जिंकून गुणतालिकेत टॉपला पोहचण्यासाठी प्रयत्नशील असेल. या सामन्यात CSK चा जलदगती गोलंदाज खलील अहमद (Khaleel Ahmed ) याच्यासमोर किंग कोहलीला रोखण्याचे एक मोठे चॅलेंज असेल. चेपॉकच्या मैदानात आग ओकणारी गोलंदाजी करताना खलील अहमदनं किंग कोहलीला खुन्नस देत त्याच्याशी पंगा घेतल्याचे पाहायला मिळाले होते. मैदानातील अशा घटना कोहली मनात धरून ठेवतो अन् योग्यवेळी 'करेक्ट कार्यक्रम'ही करतो. त्यामुळे बंगळुरुच्या मैदानात खलील अहमदसमोर कोहलीचं 'विराट' चॅलेंज असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट वर्सेस कोहली; कसा आहे दोघांचा एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड
चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात खलील अहमद याने विराट कोहलीला ३ चेंडू टाकले यात त्याने त्याला एकही धाव दिली नव्हती. आतापर्यंत २३ चेंडूत खलील अहमदनं कोहलीसमोर फक्त ३४ धावा खर्च केल्या आहेत. यात २०१९ च्या हंगामात त्याने कोहलीला बाद केले होते. विराट कोहलीनं त्याच्या विरुद्ध ३ चौकार आणि २ षटकारासह ३४ च्या सरासरीसह १४७.८ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या आहेत. या आकडेवारीनुसार, दोघेही एकमेकांना कडवी टक्कर देण्यास सक्षम असल्याचे दिसून येते.
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
खलील अहमदची IPL मधील कामगिरी
आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत खलील अहमद याने ६७ सामन्यात ८८ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईची कामगिरी खराब राहिली असली तरी खलील अहमद याने आपल्यातील धमक दाखवली आहे. १० सामन्यात त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २९ धावा खर्च करत ३विकेट्स ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.