जो संघ Qualifier 1 खेळलाय तोच चॅम्पियन ठरल्याचा इतिहास! एक अपवाद त्यात RCB ला पराभवाचा टॅग

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात फक्त एकदाचं असं घडलं. त्यातही आरसीबीला बसला होता फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 19:24 IST2025-05-29T19:15:49+5:302025-05-29T19:24:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Qualifier 1 Both Team Chance To Win First Trophy Did You Know Interesting Record And Fact | जो संघ Qualifier 1 खेळलाय तोच चॅम्पियन ठरल्याचा इतिहास! एक अपवाद त्यात RCB ला पराभवाचा टॅग

जो संघ Qualifier 1 खेळलाय तोच चॅम्पियन ठरल्याचा इतिहास! एक अपवाद त्यात RCB ला पराभवाचा टॅग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Qualifier 1 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने टॉप २ मध्ये आपले स्थान पक्के केले. या कामगिरीसह दोन्ही संघ पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या अगदी जवळ पोहचले आहेत. आयपीएलच्या इतिहासात ज्यावेळीपासून प्लेऑफ्सच्या लढती खेळून विजेता निश्चित करण्यात येतोय त्यावेळी पासून क्वॉलिफायर १ ची लढत खेळणारा अर्थात पहिल्या दोनमध्ये असणारा संघच चॅम्पियन ठरल्याचा इतिहास आहे. यात जो एक अपवाद आहे त्यात आरसीबीलाच पराभावाचा टॅग लागल्याचे पाहायला मिळाले होते. इथं एक नजर टाकुयात त्या खास रेकॉर्ड्सवर

फक्त एकदाच असं घडलंय ज्यावेळी टॉप २ मधील संघ जेतेपदाला मुकला

२००८  ते २०१० या पहिल्या तीन हंगामात आयपीएलमध्ये ८ संघांचा समावेश होता. या कालावधीत दोन सेमी फायनलमधून फायनलचा संघ निश्चित केला जायचा.  २०११ च्या हंगामापासून स्पर्धेत १० संघ होत आहेत. त्यावेळीपासून प्लेऑफ्सच्या लढतीनंतर चॅम्पियन कोण ते ठरवले जाते. ज्यावेळीपासून प्लेऑफ्सच्या लढती अर्थात क्वालिफायर १, एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर २ या लढतीनंचक फायनल संघ निश्चित केला जातो त्यावेळीपासून फक्त एकदाच टॉप २ मधील संघ जेतेपदाला मुकल्याचे पाहायला मिळाले.  

२०१६ च्या हंगामात SRH संघानं किंग कोहलीच्या RCB ला दिला होता पराभवाचा दणका

२०११ ते २०२४ या कालवधीत आयपीएलमध्ये फक्त एकदा म्हणजे २०१६ च्या हंगामात एलिमिनेटर सामना खेळणाऱ्या संघाने जेतेपद पटकावल्याचे पाहायला मिळाले होते. या हंगामात गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या हेन संघ गुणतालिकेत पहिल्या-दुसऱ्या स्थानावर राहिले होते. क्वालिफायर १ खेळलेल्या आरसीबीच्या संघाने फायनलही गाठली पण तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या संघानं फायनल जिंकत ट्रॉफी जिंकली होती. फायनलमध्ये आरसीबीच्या संघाला पराभवाचा टॅग लागला होता. 

कोणत्या हंगामात कोणत्या संघाने क्वॉलिफायर खेळली अन् कोण ठरले चॅम्पियन

  • २०२४ -  १. कोलकाता नाईट रायडर्स, २. सनरायझर्स हैदराबाद, ३. राजस्थान रॉयल्स, ४ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु. विजेता संघ- कोलकाता नाईट राडर्स
  • २०२३-  १. गुजरात टायटन्स , २. चेन्नई सुपर किंग्ज, ३. लखनौ सुपर जाएंट्स, ४. मुंबई इंडियन्. विजेता संघ -चेन्नई सुपर किंग्ज
  • २०२२- १. गुजरात टायटन्स, २.  राजस्थान रॉयल्स, ३. लखनौ सुपर जाएंट्स, ४. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु. विजेता संघ-गुजरात टायटन्स
  • २०२१- १. दिल्ली कॅपिटल्स, २. चेन्नई सुपर किंग्ज, ३. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, ४. कोलकाता नाईट रायडर्स.  विजेता संघ - चेन्नई सुपर किंग्ज
  • २०२० - १. मुंबई इंडियन्स, २. दिल्ली कॅपिटल्स, ३. सनरायझर्स हैदराबाद, ४. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु. विजेता संघ-मुंबई इंडियन्स
  • २०१९- १. मुंबई इंडियन्स, २. चेन्नई सुपर किंग्ज, ३.दिल्ली कॅपिटल्स, ४. सनरायझर्स हैदाराब. विजेता संघ मुंबई इंडियन्स 
  • २०१८- १. सनरायझर्स हैदराबाद, २. चेन्नई सुपर किंग्ज, ३. कोलकाता नाईट रायडर्स, ४. राजस्थान रॉयल्स -  विजेता संघ-  चेन्नई सुपर किंग्ज
  • २०१७- १. मुबई इंडियन्स , २. रायझिंग पुणे सुपर जाएंट्स, ३. सनरायझर्स हैदराबाद, ४. कोलाकाता नाईट रायडर्स.  विजेता संघ- मुंबई इंडियन्स
  • २०१६ - १. गुजरात लायन्स, २. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, ३. सनरायझर्स हैदराबाद , ४. कोलकाता नाईट रायडर्स. विजेता संघ सनरायर्स हैदराबाद
  • २०१५- १. चेन्नई सुपर किंग्ज, २. मुंबई इंडियन्स, ३. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु,  ४. राजस्थान रॉयल्स.  विजेता संघ -मुंबई इंडियन्स
  • २०१४- १. पंजाब किंग्ज, २. कालकाता नाईट रायडर्स, ३. चेन्नई सुपर किंग्ज, ४. मुंबई इंडियन्स.  विजेता संघ - कोलकाता नाईट रायडर्स विजेता
  • २०१३ -१.  चेन्नई सुपर किंग्ज, २. मुंबई इंडियन्स, ३. राजस्थान रॉयल्स,  ४. सनरायझर्स हैदराबाद.  विजेता संघ- मुंबई इंडियन्स
  • २०१२- १. दिल्ली डेअरविल्स, २. कोलकाता नाईट रायडर्स, ३. मुंबई इंडियन्स,  ४. चेन्नई सुपर किंग्ज. विजेता संघ- कोलकाता नाईट रायडर्स
  • २०११- १. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, २. चेन्नई सुपर किंग्ज, ३. मुंबई इंडियन्स, ४. कोलकाता नाईट रायडर्स. विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज

Web Title: IPL 2025 Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Qualifier 1 Both Team Chance To Win First Trophy Did You Know Interesting Record And Fact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.