Join us

IPL 2025: धर्मशालाऐवजी आता 'या' मैदानावर खेळवला जाईल पंजाब- मुंबई यांच्यातील सामना

PBKS vs MI: पंजाब आणि मुंबई यांच्यातील आयपीएल सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:08 IST

Open in App

पंजाब किंग्जचा मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी खेळला जाणारा आयपीएल सामना धर्मशालाहून अहमदाबादला हलवण्यात आला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर श्रीनगर, जम्मू, चंदीगड, शिमला, अमृतसर, जोधपूर, जैसलमेर, जामनगर आणि मुंद्रा यासह उत्तर भारतातील अनेक विमानतळ सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आले. यामुळे पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामन्याचे ठिकाणात बदल करण्यात आला. 

गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आणि मुंबई यांच्यातील आयपीएल सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार नाही. हा सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे हा सामना आयपीएल २०१५ मधील तटस्थ ठिकाणी खेळला जाणारा पहिला सामना ठरेल. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पुढील आठ दिवसांत तीन सामने खेळवले जाणार आहेत. धर्मशाला आणि आसपासची विमानतळे बंद असल्यामुळ मुंबई इंडियन्सला पंजाबकडे जाता आले नाही. बुधवारी ते विमानाने जाणार होते. परंतु, विमानतळ बंद असल्याने ते मुंबईमध्येच थांबले.

मुंबई- पंजाब यांच्यातील सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण प्ले- ऑफच्या अंतिम चारमध्ये जागा मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स १२ सामन्यांत सात विजय मिळवत १४ गुणांसह हे चौथ्या तर पंजाब किंग्ज ११ सामन्यांमध्ये सात विजयांसह पंजाब किंग्ज हे तिसऱ्या स्थानावर असणार आहेत. पंजाबला आणखी तीन सामने खेळायचे आहेत. तर, मुंबईकडे आता फक्त दोन सामने बाकी आहेत. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सपंजाब किंग्स