"चमकता तारा...!"; प्रियांश आर्यच्या शतकी खेळीवर प्रीती जाम खुश झाली, सेल्फीसह इंस्टावर लांबलचक पोस्ट लिहिली

Preity Zinta on Priyansh Arya Century:  प्रीतीने, या २४ वर्षीय फलंदाजाचे कौतुक करत, क्रिकेटच्या या स्फोटक खेळात आपण एका चमकत्या ताऱ्याचा जन्म होताना बघितला, असे म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 19:39 IST2025-04-10T19:36:22+5:302025-04-10T19:39:48+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2025 Preity Zinta Jam was delighted with Priyansh Arya's century, wrote a long post on Instagram with a selfie says Shining star | "चमकता तारा...!"; प्रियांश आर्यच्या शतकी खेळीवर प्रीती जाम खुश झाली, सेल्फीसह इंस्टावर लांबलचक पोस्ट लिहिली

"चमकता तारा...!"; प्रियांश आर्यच्या शतकी खेळीवर प्रीती जाम खुश झाली, सेल्फीसह इंस्टावर लांबलचक पोस्ट लिहिली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ मध्ये, पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रियांश आर्यने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध तडाखेबाज शतक झळकवून पंजाब किंग्जची सह-मालकीन तथा बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचे लक्ष वेधून घेतले. यानंतर प्रीतीने, या २४ वर्षीय फलंदाजाचे कौतुक करत, क्रिकेटच्या या स्फोटक खेळात आपण एका चमकत्या ताऱ्याचा जन्म होताना बघितला, असे म्हटले आहे.

42 चेंडून 103 धावांची खेळी - 
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या २२ व्या सामन्यात युवा सलामीवीर प्रियांश आर्य याने धमाकेदार खेळीसह इतिहास रचला. पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात करताना त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध शतकी खेळी केली. त्याच्या शतकानंतर पंजाब फ्रँचायझी संघाची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्रीचा आनंद बघण्याजोगा होता. या सामन्यात प्रियांशने 39 चेंडूंत शतक झळकावले. हे शतक आयपीएलच्या इतिहासातील चौथा क्रमांकाचे सर्वात वेगवान शतक ठरले. यानंतर  प्रीतीने आपल्या इंस्टाग्रामवर प्रियांश सोबतचे काही फोटो शेअर करत लिहिले आहे, "गेली रात्र फारच विशेष होती. आम्ही क्रिकेटचा एक धमाकेदार सामना आणि एका चमकत्या ताऱ्याचा जन्म पाहिला."

ती पुढे म्हणाली, "काही दिवसांपूर्वी मी 24 वर्षीय प्रियांश आर्यासह आमच्या काही युवा खेळाडूंची भेट घेतली होती. तो शांत, लाजाळू आमि विनंम्र वाटत होता आणि संपूर्ण संध्याकाळ तो एकही शब्द बोलला नाही. मी कल रात्री पीबीकेएस विरुद्ध सीएसके सामन्या दरम्यान त्याला भेटले. यावेळी त्याच्या आक्रामक फलंदाजीने केवळ मलाच नाही, तर संपूर्ण देशाला चकित केले. त्याने 42 चेंडून 103 धावा फटकावत विक्रम नोंदवला."


प्रीती पुढे म्हणाली, "प्रियांश तुझा अभिमान वाटचो. एखाद्याची कृती त्याच्या शब्दांपेक्षाही अधिक बोलकी असते. याचे तू उत्तम उदाहरण आहेस. हसत राहा आणि चमकत राहा. तू केवळ माझेच नाही, तर खेळ बघण्यासाठी आलेल्या सर्वांचेच मनोरंजन केले. यासाठी धन्यवाद...
 

Web Title: ipl 2025 Preity Zinta Jam was delighted with Priyansh Arya's century, wrote a long post on Instagram with a selfie says Shining star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.