IPL 2025 Points Table Updated After MI vs KKR 12th Match: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघानं घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात अखेर यंदाच्या हंगामातील पहिला विजय निश्चित केला. वानेखेडेच्या मैदानात रंगलेल्या १२ व्या सामन्यात मुंबई इंडिसन्सच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात ८ विकेट्स राखून दाबात विजय नोंदवला. या विजयासह २ गुण मिळवत मुंबई इंडियन्सच्या संघानं गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तम धावगतीसह सामना जिंकल्यामुळे MI च्या संघाला झाला मोठा फायदा
पहिल्या दोन सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात तळाला होता. मोठ्या फरकाने विजय नोंदवत मुंबई इंडियन्सने आता थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघ रसातळाला गेला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्धही त्यांना खाते उघडता आले नव्हते. पण कोलकाता विरुद्धच्या दिमाखदार विजयासह त्यांनी धावगतीमध्येही कमालीची सुधारणा करत गुणतालिकेत आपले स्थान उत्तम केल्याचे दिसते.
शेर ए पंजाब! कोण आहे Ashwani Kumar? ज्यानं पहिल्या चेंडूवर घेतली अजिंक्य रहाणेची विकेट
मुंबई इंडियन्सनं पहिल्या विजयासह KKR अन् CSK सह चार संघानं टाकले मागे
मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या ३ सामन्यातील एका विडयासह ६ व्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यांचे नेट रन रेट +०.३०९ असे आहे. मुंबई इंडियन्सनं उत्तम धावगतीसह सामना जिंकत केकेआरसह चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांना मागे टाकले आहे.
हे चार संघ टॉप ४ मध्ये
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सर्वात आघाडीवर आहे. त्यापाठोपाट दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा नंबर लागतो. या दोन्ही संघांनी अद्याप एकही सामना गमावलेला नाही. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौचा संघ तिसऱ्या तर शुबमन गिलचा गुजरात टायटन्स संघ चौथ्या स्थानवर आहे.