Join us

IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?

RCB ची संधी हुकली, आता कोणता संघ प्लेऑफ्ससाठी पहिल्यांदा ठरू शकतो पात्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 00:41 IST

Open in App

आयपीएल स्पर्धेच्या सुधारित वेळापत्रकातील पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फेरले. हा सामना पावसामुळे वाया गेल्यामुळे गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात आला आहे. एका बाजूला चार संघ बाहेर पडले असताना एकही संघासमोर Q अर्थात पात्र असल्याचा अधिकृत शिक्का उमटलेला दिसत नाही. गुणतालिकेत हे चित्र आघाडीच्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी यंदा तगडी स्पर्धा सुरु असल्याचे स्पष्ट होते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

RCB ची संधी हुकली, आता कोणता संघ प्लेऑफ्ससाठी पहिल्यांदा ठरू शकतो पात्र 

आता उर्वरित सामन्यात जो संघ पहिल्यांदा १८ गुण मिळवेल तो प्लेऑफ्ससाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरेल. पावसाच्या व्यत्ययामुळे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे RCB ची संधी हुकली असून आता गुजरात टायटन्सकडे ती संधी आहे. इथं एक नजर टाकुयात प्लेऑप्सच्या शर्यतीतील असलेल्या ६ संघांपैकी कुणाचा पेपर आहे एकदम सोपा अन् कोणत्या संघाला आहे सर्वाधिक धोका यासंदर्भातील माहिती    

IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...

गुजरातचा पेपर एकदम सोपा, कारण...

११ सामन्यानंतर गुजरातच्या संघाच्या खात्यात १६ गुण जमा आहेत. उर्वरित तिन्ही सामन्यातील विजयासह हा संघ २२ गुणांपर्यंत पोहचू शकतो. अव्वलस्थानावर पोहचण्यासी संधी असलेल्या हा संघ १८ मार्चला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला भिडणार आहे. हा सामना जर त्यांनी जिंकला तर प्लेऑफ्ससाठी पात्र होणारा गुजरात टायटन्स हा पहिला संघ ठरेल. याशिवाय २२ मे रोजी ते लखनौ आणि २५ मे रोजी त्यांना चेन्नई सुपर किंग्जचा सामना करायचा आहे.

आरसीबीचा संघ टॉपला, पण...

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यामुळे एका गुणासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १७ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झालाय.  २३ मे रोजी त्यांना सनरायझर्स हैदराबाद आणि २७ मे रोजी ते लखनौ विरुद्ध खेळणार आहेत. उर्वरित दोन्ही सामने जिंकून ते २१ गुणांपर्यंत पोहचू शकतात. पण जर यातला एक सामना गमावला तर त्यांचे टॉपला राहण्याचे स्वप्न अधूरे राहू शकते. हा विचार करण्याआधी ते एक सामना जिंकून ते प्लेऑफ्सचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील असतील.

 पंजाब किंग्जला ३ पैकी २ सामने जिंकावे लागतील  

पंजाब किंग्जच्या संघाने ११ सामन्यात १५ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. उर्वरित ३ सामन्यातील विजयासह ते २१ गुणांपर्यंत पोहचू शकतात. त्यांचेही पहिले टार्गेट दोन सामने जिंकून १९ गुणांसह प्लेऑफ्सच तिकीट पक्के करण्याचे असेल. १८ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध ते प्लेऑफ्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.  २४ मे रोजी ते दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध तर २६ मेला मुंबई विरुद्ध सामना खेळताना दिसतील. हे दोन्ही संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीत असून त्यांच्यासाठी हे तगडे आव्हान असेल.

MI साठी प्रत्येक सामना महत्त्वाचा

मुंबई इंडियन्सचा संघ १२ सामन्यानंतर १४ गूणांवर आहे. प्लेऑफ्सचं तिकीट पक्के करण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. एक सामना जरी गमावला तरी संघ जर-तरच्या समीकरणात अडकण्याचा धोका आहे. मुंबई इंडियन्सचा संघ २१ मे रोजी पंजाब किंग्ज आणि २६ मेला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध भिडणार आहे. हे दोन्ही संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतील आहेत. 

दिल्ली कॅपिटल्ससाठीही प्रत्येक सामना महत्त्वाचा, पण एखाद्या पराभवातून सावरणं शक्य

दिल्ली कॅपिटल्स  संघाने ११ सामन्यानंतर १३ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. उर्वरित सर्व सामने जिंकून ते १९ गुणांसह प्लेऑफ्सच तिकीट पक्के करू शकतात.  १८ मे रोजी गुजरात विरुद्धचा सामना गमावला तर त्यांना उर्वरित दोन्ही सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल.  २१ मे रोजी मुंबई आणि २४ मे रोजी पंजाब विरुद्धचा सामनाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेल. 

लखनौच्या संघ रिस्क झोनमध्ये

लखनौचा संघही अजून प्लेऑफ्सच्या शर्यतीत कायम आहे. ११ सामन्यानंतर त्यांच्या खात्यात सर्वच्या सर्व सामने उत्तम रनरेटसह जिंकून ते १६ गुणांसह प्लेऑफ्समधील एन्ट्रीसाठी प्रयत्नशील असतील. यंदाच्या हंगामात १४ चा कट ऑफ मुश्किल असल्यामुळे एका सामन्यातील पराभवासह ते स्पर्धेबाहेर पडू शकतात. सर्वात मोठा धोका LSG च्या संघाला आहे. कारण त्यांना १९ मे रोजी होणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यासह २२ मे रोजी गुजरात आणि २७ मे रोजी आरसीबीचे चॅलेंज थोपवण्याचे आव्हान असेल.

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरगुजरात टायटन्समुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सपंजाब किंग्सलखनौ सुपर जायंट्स