IPL 2025 Playoffs Race Qualification Scenarios : आयपीएलच्या यंदाच्या १८ व्या हंगामातील स्पर्धा प्लेऑफ्सच्या दिशेने वाटचाल करत आहे. चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स पाठोपाठ आता सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता ४ जागेसाठी १० पैकी ७ संघ दावेदार आहेत. इथं एक नजर टाकुयात यातील कोणत्या संघासमोर प्लेऑफ्स गाठण्यासाठी काय समीकरण आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी एकदम सोपा पेपर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने ११ पैकी ८ सामन्यातील विजयासह आपल्या खात्यात १६ गुण जमा केले आहेत. १६ ही मॅजिक फिगर असली तरी यंदाच्या हंगामात तगडी फाइट असल्यामुळे अजूनही त्यांच्यासमोर पात्र ठरल्याचा टॅग लागलेला नाही. उर्वरित ३ सामन्यातील एक विजय त्यांच्यासाठी प्लेऑफ्ससाठी पुरेसा ठरेल. हा संघ या एका सामन्याचा विचार न करता गुणतालिकेत टॉपला राहून थेट फायनल खेळण्यासाठी प्रयत्नशील असेल. आरसीबीचा संघ आपले उर्वरित तीन सामने लखनौ सुपर जाएंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळणार आहे. यातील फक्त दोन संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीत आहेत.
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)पंजाब किंग्जलाही खूप मेहनत घ्यावी लागणार नाही
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या संघाने ११ पैकी ७ सामन्यातील विजयासह एका अनिर्णित सामन्यासह आपल्या खात्यात १५ गुण जमा केले आहेत. या संघालाही उर्वरित ३ सामन्यात १ विजय प्लेऑफ्समध्ये पात्र होण्यासाठी पुरेसा ठरेल. हा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्ससहमुंबई इंडियन्सशिवाय स्पर्धेतून बाद झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध एक सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्सला गाफिल राहून जमणार नाही
पहिल्या पाच सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडिन्सने मुंसडी मारली आहे. ११ सामन्यात ७ विजयासह MI च्या खात्यात १४ गुण जमा आहेत. उर्वरित ३ सामन्यात १६ चा आकडा पार करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. त्यांच्यासमोर गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे आव्हान असेल. हे तिन्ही संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतील आहेत. त्यामुळे कोणताही सामना हलक्यात घेऊन चालणार नाही.
गुजरात टायटन्स चार सामने शिल्लक असल्यामचा फायदा
गुजरातच्या संघाने १० सामन्यातील ७ विजयासह १४ गुणांची कमाई केलीये. उर्वरित चार सामन्यात हा संघ मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जाएंट्स या प्लेयऑफ्सच्या शर्यतीतील संघाविरुद्ध तीन सामने खेळेल. याशिवाय चौथा आणि अखेरचा सामना ते चेन्नई सुपर किंग्जसोबत खेळतील. ४ पैकी किमान दोन विजय त्यांना प्लेऑफ्सचं तिकीट मिळवून देण्यास पुरेसे ठरतील.दिल्ली कॅपिटल्ससमोरही तगडे चॅलेंज
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ११ सामन्यात ६ विजयासह एका अनिर्णित सामन्यासह १३ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. उर्वरित ३ सामन्यात किमान दोन सामने जिंकून सेफ झोनमध्ये राहण्याचे चॅलेंज त्यांच्यासमोर असेल. दिल्लीसमोर गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या तगड्या संघांचे आव्हान असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने ११ सामन्यातील ५ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह आपल्या खात्यात ११ गुण जमा केले आहेत. उर्वरित तिन्ही सामन्यातील विजयासह १७ गुण मिळवत त्यांना प्लेऑफ्स गाठण्याची संधी आहे. एक सामना गमावला तर १५ गुणांसह ते जर-तरच्या समीकरणात अडकू शकतात. पण दोन सामने गमावले तर मात्र त्यांचा स्पर्धेतील प्रवासच संपुष्टात येईल. या संघासमोर चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना करावा लागेल.
लखनौ सुपर जाएंट्सलाही एक पराभव ठरू शकतो धोक्याचा
रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाच्या खात्यात ११ सामन्यानंतर १० गुण जमा आहेत. उर्वरित ३ सामन्यातील विजयासह ते १६ गुणांसह आपली दावेदारी टिकवू शकतात. पण त्यांच्यासमोर आव्हान सोपे नाही. कारण या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादचा सामना करायचा आहे.