Preity Zinta Goes Crazy As Priyansh Arya Hits Fastest IPL Ton : इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या २२ व्या सामन्यात युवा सलामीवीर प्रियांश आर्य याने धमाकेदार खेळीसह इतिहास रचला. पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात करताना त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध शतकी खेळी केली. त्याच्या शतकानंतर पंजाब फ्रँचायझी संघाची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्रीचा आनंद बघण्याजोगा होता. घरच्या मैदानात संघाला चीअर करण्यासाठी आलेल्या प्रीतीनं युवा प्रियांशच्या शतकानंतर अक्षरश: उड्या मारून आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. प्रियांशच्या दमदार खेळीनंतर प्रीती झिंटाची रिअॅक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सर्वात जलद शतक ठोकणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला प्रियांश
पंजाबचे घरचे मैदान असलेल्या मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. पण ठराविक अंतराने विकेट पडत असतानाही प्रियांश आपल्या आक्रमक अंदाजात खेळला. १९ चेंडूत अर्धशतक साजरे करणाऱ्या प्रियांशनं पुढच्या २० चेंडूत शतक साजरे केले. ३९ चेंडूतील शतकासह तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकवणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.
KKR vs LSG : मॅच आधी आयडॉलची भेट; मग त्याची विकेट घेत पुन्हा नोटबूक स्टाइल सेलिब्रेशन (VIDEO)
प्रीतीचा आनंद गगनात मावेना! स्टँडमध्ये उड्या मारताना दिसली संघ मालकीण
पंजाबच्या डावातील १३ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मथीशा पाथीरानाला खणखणीत चौकार मारत त्याने शतक साजरे केले. मोठा पराक्रम केल्यावरही त्याने हेल्मेट काढत हात उंचावून 'जंटलमेन'च्या अंदाजात शतकाचा आनंद व्यक्त केला. डग आउटमधील सहकाऱ्यांनी स्टँडिंग ओव्हेशन देत टाळ्या वाटवत युवा खेळाडूच्या खेळीला दाद दिली. स्टँडमध्ये उपस्थितीत प्रीती झिंटानं उड्या मारत आनंद व्यक्त करत प्रियांशच्या खेळीला फिदा असल्याचे दाखवून दिले.
Web Title: IPL 2025 PBSK vs CSK 22nd Match Preity Zinta Goes Crazy As Priyansh Arya Hits Fastest IPL Ton By An Uncapped Batter
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.