Join us

RCB समोर पंजाब 'किंग्ज' ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम

प्लेऑफ्समध्ये तिसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 21:59 IST

Open in App

IPL 2025 Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru, Qualifier 1 Lowest team totals in IPL playoffs : घरच्या मैदानात क्वालिफायरची पहिली लढत खेळण्याची संधी मिळूनही पंजाब किंग्ज संघाच्या पदरी निराशा पडलीये. यंदाच्या हंगामात नंबर वन ठरलेला संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर सपशेल अपयशी ठरला. चंडीगड येथील मुल्लानपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना RCB च्या भेदक माऱ्यासमोर PBKS च्या ताफ्यातील एकाही बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. संघाने रडत खडत शंभरी गाठली, पण १४.१ षटकातच पंजाब किंग्जचा डाव १०१ धावांत आटोपला. पंजाबचा संघ प्लेऑफ्समध्ये सर्वात कमी षटकांत ऑलआउट होणारा संघ ठरला आहे. याआधी आयपीएलच्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघावर नॉकआउट राउंडमध्ये १६.१ षटकात ऑलआउट होण्याची नामुष्की ओढावली होती.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

PBKS कडून फक्त तिघांनी गाठला दुहेरी आकडा

पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रभसिमरन १८ (१०), स्टॉयनिस २६ (१७) आणि अझमतुल्लाह ओमरझाई  १८ (१२) वगळता अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी पंजाब किंग्जचा डाव १४.१ षटकात १०१ धावांवरच आटोपला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून हेजलवूड आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स मिळाल्या. यश दयाल याने २ आणि शेफर्ड भुवी या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्ल...

आयपीएलच्या प्लेऑफ्समधील निच्चांकी धावसंख्येचा रेकॉर्ड

पंजाब किंग्जनं केलेल्या १०१ धावा हा आयपीएलमधील प्लेऑफ्समधील तिसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या आहे. २०१० च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स संघाने डीवाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात डेक्कन चार्जर्सच्या संघाला ८२ धावांत ऑलआउट केल्याचा रेकॉर्ड आहे. २००८ च्या सेमीफायनलमध्ये वानखेडेच्या मैदानात राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिल्ली डेअरडेविल्स संघाला ८७ धावांत आटोपले होते.  

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट