Join us

IPL 2025 : २ कोटीत फक्त १ सामना! प्रीतीच्या संघातून त्याला दुसरी संधी मिळणार?

एक सामना खेळून बाकावर बसण्याची आली वेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 11:11 IST

Open in App

IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 Player to Watch Kyle Jamieson Punjab Kings : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील क्वालिफायर १ च्या लढतीत पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार आहे. थेट फायनल गाठण्यासाठी पंजाबच्या संघाला बॅटिंग-बॉलिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. या सामन्यात गोलंदाजीमध्ये काइल जेमिसन याला दुसरी संधी मिळणार का? तेही पाहण्याजोगे असेल. २ कोटीच्या या गड्यावर एक सामना खेळून बाकावर बसण्याची वेळी आली होती.  इथं एक नजर टाकुयात आयपीएलमधील त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

RCB च्या संघाने मोठ्या पॅकेजसह दिली होती पदार्पणाची संधी न्यूझीलंडचा मध्यम जलदगती गोलंदाज काइल जेमिसन याने २०२१ च्या हंगामात RCB कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. रॉयल चॅलेंजर्सच्या संघाने या किवी गोलंदाजासाठी तब्बल १५ कोटी रुपये मोजले होते. पदार्पणाच्या हंगामात ९ सामन्यात ३२ षटके गोलंदाजी करताना त्याने  ९ विकेट्स घेतल्या. किंमतीच्या तुलनेत हिंमत न दाखवल्यामुळे RCB  नं त्याला रिलीज केले होते. २०२३ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने भाव पाडून १ कोटी रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. पण दुखापतीमुळे त्याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतल्याचे पाहायला मिळाले होते. 

टी२० क्रिकेटमध्ये एका संघासाठी सर्वाधिक धावा, जाणून घ्या टॉप ५ फलंदाजांची नावे!

तीन वर्षांनी केलं कमबॅक, एक सामना खेळून बाकावर बसण्याची वेळ

२०२१ मध्ये पहिल्या हंगामात ९ सामने खेळल्यावर आता थेट २०२५ च्या हंगामात तो आयपीएलच्या मैदानात उतरलाय. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातून त्याने पंजाबकडून पदार्पण केले. या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नव्हती. ४ षटकात त्याने ४२ धावा खर्च केल्या. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर बाकावर बसण्याची वेळ आली. पण आता आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी मार्को यान्सेन याने पंजाबची साथ सोडलीये. त्याच्या जागी पंजाबला जेमिसनचा पर्याय उपलब्ध असेल.

२ कोटींचा सौदा

 

लॉकी फर्ग्युसन दुखापतग्रस्त झाल्यावर पंजाबच्या संघाने काइल जेमिसन याला बदली खेळाडूच्या रुपात संघात सामील करून घेतले आहे. त्याच्यासाठी प्रीतीच्या संघाने २ कोटी एवढी मोठी रक्कम मोजलीये. पंजाबचा संघ टॉपला असल्यामुळे प्लेऑफ्समध्ये ते किमान दोन सामने खळतील अशी अपेक्षा आहे. यात जेमिसनला  मार्को यान्सेनच्या जागी किती सामन्यात संघ त्याच्यावर भरवसा दाखवणार? अन् तो छाप सोडणार का? ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट