Join us

IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...

जोश हेजलवूडचं दमदार कमबॅक, अय्यरसह जॉश इंग्लिसनं टाकली नांगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 21:19 IST

Open in App

IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : चंडीगड येथील मुल्लानपूरच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या क्वॉलिफायर लढतीत रॉयल चॅलेंजर्सच्या गोलंदाजीसमोर पंजाबचे किंग्ज ढेर झाल्याचे पाहायला मिळाले. दुखापतीतून सावरून जोश हेजलवूड याने यासामन्यात दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. यश दयाल आणि भुवीनं पंजाबला धक्क्यावर धक्के दिल्यावर जोश हेजलवूडनं आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून देताना आपल्या पहिल्या ७ चेंडूत दोन मोठ्या विकेट्स घेतल्या.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

जबरदस्त कमबॅक; पहिल्या ७ चेंडूत २ मोठे मासे लागले गळाला, मग...

जोश हेजलवूड याने पंजाब किंग्जचा भरवशाचा खेळाडू अन् कॅप्टन श्रेयस अय्यरच्या २ (३) रुपात या सामन्यातील पहिली विकेट घेतली. त्यानंतर त्याने जॉस इंग्लिसला ४ (७) तंबूत धाडले. पहिल्या तीन षटकात दोन विकेट्स घेतल्यावर आपल्या अखेरच्या षटकात एक विकेट घेत त्याने कमबॅक सामन्यात ३ विकेट्स घेतल्या. या तीन विकेट्सच्या मदतीने यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो ट्रेंट बोल्टला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहचलाय.  

जो संघ Qualifier 1 खेळलाय तोच चॅम्पियन ठरल्याचा इतिहास! एक अपवाद त्यात RCB ला पराभवाचा टॅग

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत 

चेन्नई सुपर किंग्जचा नूर अहमद अव्वलस्थानी आहे. त्याने १४ सामन्यात २४ विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नई  सुपर किंग्जचा स्पर्धेतील प्रवास प्लेऑफ्सआधीच संपुष्टात आल्यामुळे तो या शर्यतीत शेवटपर्यंत टिकणं मुश्किल आहे. त्यापाठोपाठ या यादीत प्रसिद्ध कृष्णा दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सच्या संघाकडून त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत. जोस हेजलवूड त्याला मागे टाकून पर्पल कॅप पटकवण्याचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.

पंजाबचा संघ १०१ धावांत ऑलआउट

पहिल्या क्वालिफायर लढतीत पंजाब किंग्जकडून एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. थेट फायनलचा डाव साधण्याच्या लढतीत पंजाब किंग्जचा संघ १४.१ षटकात १०१ धावांवर ऑलआउट झाला. जोश हेजलवूडशिवाय या सामन्यात सुयश शर्मानेही ३ विकेट्स घेतल्या. यश दयालनं २ तर भुवी आणि शेफर्डने प्रत्येकी एक एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट