IPL 2025 PBKS vs RCB 37th Match Player to Watch Liam Livingstone Royal Challengers Bengaluru : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दिमाखदार सुरुवात केली. पण घरच्या मैदानावर त्यांच्यावर वाइट वेळ आली. हंगामातील अर्धा टप्पा पार करताना तीन वेळा घरच्या मैदानात पाहुण्या संघाने RCB चा करेक्ट कार्यक्रम केला. परिणामी ७ सामन्यानंतर ४ विजय आणि ३ पराभवासह रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील किंग कोहलीचा संघ ८ गुणावरच थांबलाय. ज्या पंजाबच्या संघाने RCB ला घरच्या मैदानावर मात दिली त्या संघाला आता त्यांच्या घरात पराभूत करून हिशोब चुकता करत गुणतालिकेत दुहेरी आकडा गाठण्याचे चॅलेंज बंगळुरुच्या संघासमोर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
त्याचा खराब फॉर्म RCB साठी मोठी डोकेदुखीच
घरच्या मैदानातील पराभवाचा पाढा सोडला तर आरसीबीच्या संघाने बाहेरच्या मैदानात दिमाखदार कामगिरी केलीये. पण पंजाबचा तोरा बघता हे आव्हान वाटते तेवढे सोपे नाही. बाहेरच्या मैदानातील रुबाब कायम ठेवायचा असेल तर विराट कोहली, फिल सॉल्ट आणि कर्णधार रजत पाटीदार या खेळाडूंशिवाय लियाम लिविंगस्टोनलाही आपली ताकद दाखवावी लागेल. कारण तो सध्या टीमसाठी डोकेदुखी ठरताना दिसतोय.
Vaibhav Suryavanshi : आधी बरसला, मग हुंदका दाटला! भावूक होऊन तंबूत परतला वैभव
एक फिफ्टी मारली त्यातही टीम हारली
लियाम लिविंगस्टोन या इंग्लंडच्या क्रिकेटरसाठी RCB च्या संघाने ८ कोटी ७५ लाख एवढी मोठी रक्कम मोजून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात भात्यातून एक अर्धशतक पाहायला मिळाले. ४० चेंडूत ५४ धावांची ही खेळी वगळली तर तो संघर्ष करताना दिसतोय. जी एक फिफ्टी मारली त्यात संघ हारला. त्याने ७ सामन्यातील ६ डावात फक्त ८७ धावा केल्या आहेत. ही कामगिरी RCB च्या संघाला टेन्शन देणारा असाच आहे. पार्ट टाइम गोलंदाजी करताना त्याच्या खात्यात २ विकेट्सही जमा आहेत.
लियाम लिविंगस्टोनची IPL मधील कामगिरी
लियाम लिविंगस्टोन हा स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. याशिवाय पार्ट टाइम बॉलरच्या रुपातही तो उपयुक्त ठरु शकतो. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात एका शतकाचीही नोंद आहे. IPL मध्ये ४६ सामन्यातील ४५ डावा त्याने १०२६ धावा केल्या आहेत. यात त्याने ७ अर्धशतके झळकावली आहेत. आरसीबीशिवाय तो राजस्थान रॉयल्स आणि पंजाबकडूनही खेळताना दिसला आहे. २०२२ च्या हंगामात पंजाबच्या ताफ्यातून खेळताना त्याने ४२३ धावा काढल्या होत्या. ही त्याची आयपीएलच्या एका हंगामातील सर्वोच्च कामगिरी आहे. २०२३ च्या हंगामात पंजाबकडून खेळतानाच त्याच्या भात्यातून ९४ धावांची खेळीही पाहायला मिळाली होती. RCB च्या संघाला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. निम्म्या प्रवासात एक फिफ्टी मारून घडीचा प्रवाशी ठरलेला लियाम लिविंगस्टोन उर्वरित सामन्यात कशी कामगिरी करतोय ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: IPL 2025 PBKS vs RCB 37th Match Lokmat Player to Watch Liam Livingstone Royal Challengers Bengaluru
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.