Krunal Pandya Orders To Virat Kohli : पंजाब किंग्जचं घरचे मैदान असलेल्या न्यू पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून क्रुणाल पांड्यानं मैफिल लुटली. आधी त्याने गोलंदाजीला आल्यावर सेट झालेल्या पंजाबच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले. त्यानंतर फिल्डिंगचा सर्वोत्तम नजराणा पेश करताना त्याने अप्रतिम झेल घेत पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरचा खेळ खल्लास केला. एका बाजूला त्याच्या या दमदार कामगिरीची चर्चा सुरु असताना सोशल मीडियावर काहीजण त्याच्यावर संतापल्याचे दिसत आहे. त्यामागच कारण आहे किंग कोहली. मैदानात नेमकं काय घडलं? नेटकऱ्यांना क्रुणाल पांड्याची कोणती गोष्ट खटकली? जाणून घेऊया सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी अन् नेमकं काय घडलं?
पंजाब किंग्जच्या डावातील पाचव्या षटकात क्रुणाल पांड्या गोलंदाजीला आला. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीला सुरुवात करण्याआधी तो फिल्ड सेट करताना दिसले. यावेळी तो कोहलीला कुठे थांबायचं ते सांगताना दिसले. कॅप्टन रजत पाटीदार असताना कोहलीसमोर तो रुबाब का झाडतोय? अशा प्रतिक्रिया क्रुणाल पांड्या आणि कोहलीच्या व्हायरल व्हिडिओवर उमटताना दिसत आहे. कोहली हा बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार आहे. त्याच्यासोबत क्रुणाल पांड्याने असे वागणे पटत नाही. त्याने कोहलीचा आदर ठेवायला हवा, अशा काही कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
काहींनी तर मग यात हार्दिक पांड्यालाही ओढलं
आयपीएलच्या गत हंगामात हार्दिक पांड्या अशाच गोष्टीमुळे ट्रोल झाला होता. रोहित शर्माला फिल्डिंगसाठी इथं नको तिथं उभे राहा, असे म्हणत त्याने रुबाब दाखवला अन् तो नेटकऱ्यांना खटकला होता. या गोष्टीची आठवण करून देत काहीजण क्रुणाल पांड्या हा भावाप्रमाणेच वागताना दिसतोय, अशा प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत.