हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशालाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने सेट केलेल्या २३७ धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना लखनौ सुपर जाएंट्सच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मिचेल मार्श, मार्करम आणि भरवशाचा निकोलस पूरन तंबूत परतल्यावर संघाचा कर्णधार रिषभ पंतवर संघाची नय्या पार करण्याची जबाबदारी येऊन पडली. पण तो पुन्हा अपयशी ठरला. १४ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५ धावा करून तो बाद झाला. त्याची विकेट हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बॅट एका बाजूला अन् बॉल दुसऱ्या बाजूला
लखनौच्या डावातील आठव्या षटकात पंजाब किंग्जच्या ताफ्यातील अझमातुल्लाह ओमरझाई गोलंदाज करत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर रिषभ पंत याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हा फटका मारताना बॅट एका बाजूला अन् चेंडू दुसऱ्या बाजूला हवेत उडाला. सुदैवान बॅट पडली त्या दिशेला पंजाबचा कोणताही फिल्डर नव्हता. पण पंतच दुर्दैव हे की, ज्या बाजूला चेंडू हवेत उडाला तिथं शशांक सिंग होता. त्यानेही कोणतीही चूक न करता पंतचा सोपा झेल टिपला.
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
२७ कोटी घेऊन संघ मालकाला लावला चुना
रिषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. तगडी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या या विकेट किपर बॅटरसाठी लखनौच्या संघाने २७ कोटी एवढी रक्कम मोजलीये. पण त्याने संघ मालकाला चुनाच लावल्याचे दिसते. एक अर्धशतक सोडले तर त्याच्या भात्यातून एकही मोठी खेळी आलेली नाही. पंजाब विरुद्ध पंतने सुरुवात चांगली केली. पण तो बॅटही नीट न धरल्यामुळे विकेट गमावून बसल्याचे पाहायला मिळाले.