Join us

सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी

एकाच हंगामात सलग तीन अर्धशतकासह तो गेल आणि लोकेश राहुलच्या पक्तींत जाऊन बसला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 22:47 IST

Open in App

प्रभसिमरन सिंगने पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात करताना आणखी एक धमाकेदार खेळी केली. लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने ३० चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. या सामन्यात त्याला शतकाची संधी होती. पण नव्वदीच्या घरात पोहचल्यावर दिग्वेश राठीनं  त्याच्या दमदार खेळीला ब्रेक लावला. प्रभसिमरन सिंग ४८ चेंडूत ९१ धावा करून बाद झाला. या डावात त्याने ६ चौकार आणि ७ षटकार मारले. शतक हुकले असले तरी अर्धशतकासह त्याने खास विक्रम आपल्या नावे केला आहे. एकाच हंगामात सलग तीन अर्धशतकासह तो गेल आणि लोकेश राहुलच्या पक्तींत जाऊन बसला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

प्रभसिमरन सिंगची केएल राहुल अन् गेलच्या पंक्तीत

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ४९ चेंडूत ८३ धावा केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याने  ३६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली होती. आता लखनौ विरुद्ध त्याने  यंदाच्या हंगामात सलग तिसऱ्यांदा ५० पेक्षा धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जकडून एका हंगामात सलग तीन सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो तिसरा सलामीवीर ठरला. याआधी लोकेश राहुल आणि ख्रिस गेलनं पंजाबकडून अशी कामगिरी करू दाखवली आहे.

अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)

केएल राहुलनं सलग तीन हंगामात केलीये अशी कामगिरी

आयपीएलच्या इतिहासात केएल राहुल याने पंजाब किंग्ज कडून खेळताना सर्वाधिक तीन वेळा डावाची सुरुवात करताना ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. २०१८, २०१९ आणि २०२० च्या हंगामात केएल राहुलनं  पंजाबच्या डावाची सुरुवात करताना आपल्या भात्यातील सातत्यपूर्ण खेळीसह खास विक्रम सेट केला होता.

PBKS कडून सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे सलामीवीर

  • ३ – ख्रिस गेल (२०१८)
  • ३ – केएल राहुल (२०१८)
  • ३ – केएल राहुल (२०१९)
  • ३ – केएल राहुल (२०२०)
  • ३* – प्रभसिमरन सिंग (२०२५)
टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्सलखनौ सुपर जायंट्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट