IPL 2025 : कमबॅक दमदार! आता त्याच्या गोलंदाजीतील स्पीड वाढणार का? यावर असतील नजरा

तो IPL च्या इतिहासात सर्वात जलदगतीने चेंडू फेकणाऱ्या आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 17:15 IST2025-05-04T17:14:39+5:302025-05-04T17:15:31+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 PBKS vs LSG 54th Match Lokmat Player to Watch Mayank Yadav Lucknow Super Giants | IPL 2025 : कमबॅक दमदार! आता त्याच्या गोलंदाजीतील स्पीड वाढणार का? यावर असतील नजरा

IPL 2025 : कमबॅक दमदार! आता त्याच्या गोलंदाजीतील स्पीड वाढणार का? यावर असतील नजरा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 PBKS vs LSG 54th Match Player to Watch Mayank Yadav Lucknow Super Giants पंजाब विरुद्ध लखनौ यांच्यातील लढतीत भारताचा जलदगती गोलंदाज मयंक यादव याच्यावर नजरा असतील. दुखापतीमुळे क्रिकेटपासून बराच काळ दूर राहिल्यावर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातून त्याने यंदाच्या हंगामात पहिला सामना खेळला. १४० kmph पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करत त्याने दोन विकेट्सही घेतल्या. आता तो आपल्या गोलंदाजीतील गती वाढणार का? यावर नजरा असतील.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

IPL च्या इतिहासात सर्वात जलदगतीने चेंडू फेकणारे गोलंदाज

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने चेंडू टाकणाऱ्या आघाडीच्या गोलंदाजांच्या यादी मयंक यादवचा सामावेश होता. या यादीत शॉन टेट (१५७.७१ kmph), लॉकी फर्ग्युसन (१५७.३ kmph) उमरान मलिक (१५७ kmph)यांच्या पाठोपाठ मयंक यादव (१५६.७ kmph) चौथ्या क्रमांकावर आहे. 

IPL 2025 : पंजाबच्या संघाने या खेळाडूवर खेळलाय मोठा डाव, पण त्याचा तोरा अजून नाही दिसला

यंदाच्या हंगामात सर्वात वेगवान चेंडू कुणी टाकला?

यंदाच्या हंगामात सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा रेकॉर्ड हा पंजाब किंग्जच्या ताफ्यातून खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसनच्या नावे आहे.  लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने १५३.२ kmph वेगाने चेंडू फेकला होता. त्यापाठोपाठ जोफ्रा आर्चर (१५२.० kmph), नोर्तजे (१५१.६ kmph) यांचा नंबर लागतो. दमदार कमबॅक केल्यावर मयंक अग्रवाल या यादीत स्थान मिळवणार का? ते पाहण्याजोगे असेल. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या कमबॅक करताना मयांक यादवनं १४२.७ kmph वेगाने चेंडू टाकल्याचे पाहायला मिळाले होते. ४ षटकात ४० धावा खर्च करताना त्याने  रोहित शर्मासह हार्दिक पांड्याची विकेट घेतली होती. आता त्याचा वेग आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे.  

मयंक यादवची IPL मधील कामगिरी

२०२२ च्या हंगामापासून मयंक यादव हा लखनौच्या संघाचा भाग आहे. २०२४ मध्ये त्याने या संघाकडून पदार्पण केले. पदार्पणाच्या हंगामात ४ सामन्यात त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या. आपल्या गोलंदाजीतील वेगाने त्याने सर्वांनाच सरप्राइज केल्याचे पाहायला मिळाले. पण दुखापतीमुळे तो यंदाच्या हंगामातील पहिल्या ९ सामन्यांना मुकला. दमदार कमबॅकनंतर तो गती वाढवण्यासाठी जोर लावणार का? ते पाहण्याजोगे असेल.
 

Web Title: IPL 2025 PBKS vs LSG 54th Match Lokmat Player to Watch Mayank Yadav Lucknow Super Giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.