IPL 2025 PBKS vs LSG 54th Match Player to Watch Azmatullah Omarzai Punjab Kings : पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात आयपीएल २०२५ स्पर्धेतील ५४ वा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धरमशाला मैदानात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांसाठी प्लेऑफ्स शर्यतीत आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी हा सामना महत्त्वाचा असेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या १० पैकी ६ सामन्यातील विजयासह एका अनिर्णित सामन्यासह आपल्या खात्यात १३ गुण जमा केले आहेत. फर्ग्युसन पाठोपाठ ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे स्पर्धेतून आउट झाला आहे. ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीत उपयुक्त ठरला नसला तरी मोक्याच्या क्षणी त्याने संघाला महत्त्वपूर्ण विकेट्स मिळून दिल्याचे पाहायला मिळाले होते. आता ही जबाबदारी अझमतुल्लाह ओमारझाईवर असेल. एक नजर टाकुयात PBKS च्या ताफ्यातील अष्टपैलू खेळाडूच्या IPL मधील कामगिरीवर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गुजरात टायटन्सच्या संघाकडून IPL पदार्पण
२०२४ च्या हंगामात गुजरात टायटन्सच्या संघानं अफगाणिस्तानचा ऑलराउंडर अझमतुल्लाह ओमारझाई याला ५० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. गत हंगामात ७ सामन्यात त्याने ४ विकेट्स घेतल्या होत्या. बॅटिंगमध्ये फक्त त्याने १७ धावा केल्या होत्या.
मिचेल ओवेन कोण आहे? ज्याची पंजाबच्या संघात मॅक्सवेलच्या जागी झाली निवड, जाणून घ्या टी२० रेकॉर्ड
PBKS संघाने खेळलाय कोट्यवधीचा डाव
आयपीएल २०२५ च्या हंगामाआधी झालेल्या मेगा लिलावात अफगाणिस्तानच्या ऑलराउंडरसाठी पंजाब किंग्जच्या संघाने मोठी किंमत मोजली आहे. २.४ कोटींसह त्याने नव्या संघासोबत नव्या प्रवासाची सुरुवात केलीये. यंदाच्या हंगामात पंजाबकडून त्याला पदार्पणाची संधीही मिळाली. पण तीन सामन्यात त्याने फक्त १ विकेट घेतली आहे. मोठी रक्कम मोजलेल्या या खेळाडूकडून संघाला बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. संघाच्या यशात तो मोलाची कामगिरी बजावत पैसा वसूल कामगिरी करून दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: IPL 2025 PBKS vs LSG 54th Match Lokmat Player to Watch Azmatullah Omarzai Punjab Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.