PBKS vs KKR Shreyas Iyer 7th Duck for in IPL : छ पंजाबच्या न्यू चंदीगडच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात श्रेयस अय्यर कशी कामगिरी करणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. यामागचं कारण पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना तो गत हंगामात चॅम्पियन करणाऱ्या संघाविरुद्ध मैदानात उतरला होता. KKR च्या संघाला चॅम्पियन करूनही शाहरुख खानच्या मालकीच्या संघानं त्याला भाव दिला नव्हता. याचा तो राग काढेल, अशीही चर्चा रंगली. पण राग सोडा त्याला या सामन्यात एक धावही करता आली नाही. परिणामी आयपीएलमध्ये त्याच्या खात्यात सातव्यांदा भोपळा पदरी पडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हर्षित राणाची कमाल, अय्यरसह एकाच षटकात घेतल्या दोन विकेट्स
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कोलकाताच्या ताफ्यातील हर्षित राणानं श्रेयस अय्यरचा हा निर्णय चुकीचा ठरवला. चौथ्या षटकात हर्षित राणाने आधी प्रियांश आर्यच्या रुपात पंजाबची सलामी जोडी फोडली. त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या आणि दमदार कामगिरी करत असलेल्या श्रेयस अय्यला शून्यावर बाद केले. श्रेयस अय्यर दोन चेंडू खेळून बाद झाला. रमणदीप सिंगने त्याचा अप्रतिम कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले.
आधी २४ यार्ड्समधील 'दुश्मनी'चं प्रकरण गाजलं; आता रिलीज झालं बुमराह-नायर यांच्यातील 'दोस्ती'चं गाणं
एका बाजूला ICC चा पुरस्कार जिंकला अन् दुसऱ्या बाजूला..
श्रेयस अय्यर याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही छाप सोडल्याचे पाहायला मिळाले. मार्च महिन्यातील सर्वोत्तम कामगिरीसाठी तो आयसीसी प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार विजेता ठरला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याआधीच त्याला हा पुरस्कार मिळाला. एका बाजूला हा आनंद साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला त्याच्यासह पंजाबचा संघ अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले.